╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Monday, March 8, 2010

वेळीच 'नाही' म्हणायला शिका!


'प्रेमा तुझा रंग कसा', या वाक्याचा अर्थ आपल्याला सभोवताली हातात हात घेऊन हिंडणार्‍या...किंवा एकमेकांच्या बाहूपाशात हरवलेल्या...किंवा एखाद्या समुद्रकिनारी एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या 'कपल्स'कडे पाहिल्यानंतर कळतो. प्रेमाचा रंग तसा गुलाबी! पण, तो अचानक कसा बदलेल, याचा मात्र काही नेम नाही. तो रंग बदलवणारे आपणच असतो. प्रेमामध्ये आपल्या मनाविरूध्द होत असेल तर एकदम 'नाही' कसं म्हणायचं? म्हणून...मन इथे कच खाते.

'त्याला' किंवा 'तिला' वाईट वाटले तर... 'तो' किंवा 'ती' दुखावेल... अशा अनेक गोष्टीचा आपण विचार करत असतो. त्यामुळे 'त्याने' किंवा 'तिने' म्हटल्यानुसार आपण वागत असतो. 'तो' किंवा 'ती' आपल्यावर आपल्या मनाविरूध्द असणार्‍या गोष्टीही आपल्यावर लादून 'हक्क' सांगत असतो आणि आपण इच्छा नसताही ते स्वीकारत असतो. परंतु, यात आपली चूक म्हणजे आपल्याला 'नाही' म्हणता येत नाही. अर्थात 'नकार' देता येत नाही. परंतु, प्रेमात मनाविरूध्द होणार्‍या गोष्टीना नकार दिलाच पाहिजे.

'तो' म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा... मोजकेच कपडे परिधान करत जा... केस कशाला वाढवतेस.... केस तू कापलेच पाहिजे. असा 'त्याचा' हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर 'एकत्र' आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो.



'तो' म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा... मोजकेच कपडे परिधान करत जा... केस कशाला वाढवतेस.... केस तू कापलेच पाहिजे. असा 'त्याचा' हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर 'एकत्र' आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् 'ती' मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला 'तो' सांगतो, तसं करावंच लागतं....


महाविद्यालयीन जीवनात प्रेमाची उधळण करणार्‍या तरूण-तरूणीमध्ये 'न'ची बाराखडी त्यांच्याच होणार्‍या वादाचे कारण बनत असते. त्यामुळे वाद होऊ नये म्हणून तरूण- तरूणी मन मारत एकमेकांचा शब्द खाली पडू देत नाही. त्यामुळे 'त्या' दोघांतील 'प्रेम' अधिक दृढ होण्याऐवजी गुंतागुंतच वाढत जात असते. त्यांना 'नाही' म्हणायची सवय नसते किंवा 'नाही' ऐकायचीही सयव नसते. त्यामुळे कमी वेळातच त्यांच्यातील नात्याला तडे पडतात व प्रेमाला कधी न सुटणारं 'ब्रेकअप'चं ग्रहण लागतं.

यातील महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला 'नकार' देता येत नाही. प्रेमातच काय तर कुठल्याच नात्यामध्ये 'नाही' म्हणण्यासाठी आपली जीभ रेटत नाही. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, याच विचारात आपण सगळा वेळ घालवतो आणि 'नाही' म्हणण्याची संधी गमावून आपल्या पायावर धोंडा मारून बसतो. मन मारत आपण 'होकार' देत आपल्या मनातल्या मनात झुरत असतो. परंतु, आपल्या या भूमिकेमुळेच नको ते घडते. पाणी डोक्यावर गेल्यावर हात पाय हलवण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग, एकदाचा वैतागून नकार दिला जातो नि गाडी कायमची रूळावरून खाली उतरते. प्रेमात पडतानाच 'नाही' म्हणणे शिकणे महत्त्वाचं आहे.


'प्रेम' जुळते तेव्हा चांगला, वाईट असा भेद आपण करत नसतो. तर मग समोरच्याने आपण सांगितलं तसंच केलं पाहिजे हा आग्रह कशासाठी? प्रेमात आपण एकमेंकांना गुणदोषांसहित स्वीकारले असते. एकमेकांनी चांगल्या समन्वयाने आपल्यातील दोषांचे रूपांतर गुणांमध्ये केले पाहिजे. दोघांनी आपला स्वाभिमान शाबूत ठेवला पाहिजे.

प्रेमात मनाने आपण एकमेकांच्या जवळ आलो असतो तशी शरीराने ही जवळ येण्याची अपेक्षा असतेच. स्पर्शाची भाषा समजलेली असते. नको म्हणता म्हणता थोडं पुढे... थोडं मागे पाहत आपली प्रेमाची गाडी पुढे सरकत असते. अशा वेळा 'त्याला' किंवा 'तिला' नाही म्हणणं थोडं अवघडच जात असतं. 'नाही' म्हटलं तर 'तो' किंवा 'ती' आपल्याला सोडून तर जाणार नाही ना! अशा भीतीमुळे 'तो' किंवा 'ती' मन मानत नसतांना ही आग्रहाला बळी पडत असतात. भविष्यात त्याच्याकडून तिच्या व तिच्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. त्यामुळे 'नाही' म्हणण्याची आपल्याला संधीच मिळत नाही. म्हणून रामायण घडण्याच्या आधीच 'नाही' म्हणणेच 'त्याच्या' किंवा 'तिच्या'साठी गरजेचे असते.

प्रेमाचा सिग्नल ओळखा!

LOve
'प्रेम' ही आपल्या मनातील अतिशय तरल भावना आहे. प्रेम एखादा कवी त्याच्या काव्यात व्यक्त करतो, लेखक कथेचे रूप देतो तर चित्रकार विविध रंगानी ते रेखाटत असतो. मात्र, आजचा आधुनिक प्रेमवीर स्वत:ला वाटेल तशा पध्दतीने ते व्यक्त करत असतो. प्रेमात दोघांकडून 'ग्रीन सिग्नल' असेल तरच ते फुलते. एकाच बाजूने सिग्नल म‍िळत असेल तर 'एक्सीडेन्ट हो गया, रब्बा रब्बा...' अशी म्हणायचीही वेळ येते. प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्याकडून मिळणारा सिग्नल हा 'ग्रीन' आहे किंवा 'रेड' आहे तो ओळखले पाहिजे.

आपण ज्या मुलीवर प्रेम करतो त‍िनेही आपल्यावर प्रेम करायला हवे, हा हट्ट धरणे योग्य नाही. कधी तरी ती आपल्या प्रेमाला समजून घेईल, सब्र का फल मिठा होता है, असे म्हणत आयुष्य घालविणारे 'देवदास'ही मोठ्या संख्येने आहेत. 'तो' किंवा 'ती' आपलं प्रेम समजून घेईपर्यंत किती जणांना आपण विनाकारण मनस्ताप देत असतो. असे विषय वास्तव जीवनात नाही तर एखाद्या कथेचे किंवा 'एक विवाह ऐसा भी', 'क्या यही प्यार है' या सारख्या चित्रपटांचे विषय होऊ शकतात. कारण कल्पनेच्या आधारे ते रंगविलेले असतात. 'जीवन' हे स्वप्नात जगता येत नाही, जीवन जगताना वास्तव परिस्थितीचे भान ठेऊन तिच्याशी सामना करावा लागत असतो. परंतु प्रेमाने पछाडलेल्या 'त्याला' व 'तिला' हे सांगेल कोण?

प्रेमात पडणारं वय हे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचं वय असतं. हे वय आपलं आयुष्य घडवत असतं तसं उद्‍धवस्तही करत असतं.
प्रेम हे केवळ एकच बाजून फुलत नसून दोन्ही बाजूंनी फुलत असतं. आपल्याला जर समोरच्या व्यक्तीकडून सकारात्मक संकेत मिळत नसेल तर त्याच्या विषयी प्रेम व्यक्त करून मनस्तापाशिवाय आपल्या पदरात काहीच पडणार नाही.

एकतर्फी प्रेमातून चांगलं घडण्याऐवजी वाईटच घडत असतं. प्रेमाच्या एका ऋतु मागून दुसरा ऋतू येत असतो. प‍िवळी झालेली पाने गळून पडतात तर त्या जागी हिरवी पालवी फुटते. प्रेम हे अचानक होत असतं, जबरदस्तीचा सौद्यात नेहमी घाटा सहन करावाच लागतो. आपला 'देवदास' होऊ नये म्हणून प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीत आपल्याविषयी प्रेम आहे किंवा नाही हे ओळखणे आवश्यक आहे.

प्रेम' पूर्व नियोजित नसते!

love
'प्रेम' हा काही प्रायोजित कार्यक्रम नही की, इच्छेनुसार केले अथवा इच्छा नसली म्हणजे थांबविला. 'प्रेम' मानवी भावना आहे. तिच्यावर कोणाचेही 'राज' चालत नाही. 'प्रेम' हे 'स्टॉप वॉच' तर मुळीच नाही. म्हणजे मर्जी असली की सुरू केलं व मर्जी नसली की बंद. 'प्रेम' तर अमृताचा झरा आहे. तो निरंतर सुरूच रहाणार आहे.

गालिब म्हणतात...

''प्रेम ऐसा आतिशी जज्बात है, जो सप्रयास लगता नहीं है और सप्रयास बुझता नहीं है।''

''यह तो बस, होता है तो हो जाता है। नहीं होता है, तो नहीं होता है।''


हिर- रांझा, लैला- मजनू, राधा- कृष्‍ण यांच्यातील 'प्रेम' हे पूर्व नियोजित नव्हतेच! त्याला इतिहास साक्ष आहे.

'
प्रेम' 'दिले से' होत असते. प्रेमात व्यक्ती नाही तर भावनांना महत्त्व असते. आपल्या भावना जुळल्या म्हणजे प्रेमाचे फुल अलगद उमल असतं. असे देश, धर्म, जाती, भाषा, परंपरा व संस्कृती यांची बंधने, मर्यादा झुगारून लावत असतं. प्रेमाची एक भाषा असते. प्रेम करणारे ती भाषा जाणतात, बोलतात. प्रेमात जात, चेहरा, वय पाहिले जात नाही तर मन पाहिले जाते.

'न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन,

जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन।'


मात्र, आजची पिढी... आज 'ही' तर उद्या 'ती' असा प्रेमाचा बाजार मांडताना दिसतात. गाढव प्रेमाचा खेळ खेळतात. त्यांचा क्षणाचा खेळ हा त्याच्या आयुष्यभराच्या वेदना होऊ शकतात, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

Saturday, February 13, 2010

फक्त एक होकार,..

फक्त एक होकार,
कुणाचं तरी जीवन बदलु शकतं,
जीवनाच्या गाडीत वंगण घालु शकतं,
कोणाचं तरी जीवन वेगवान करु शकतं!

तुझ्या फक्त एका होकाराने,
कुणाचं तरी रुप पालटेल,
आयुष्याचा रंग बदलेल
कदाचित वसंतही बहरेल!

एक कोमल नाजुक हात हातात येईल,
आपलं म्हणुन तुला कुणी मिठीत घेईल,
त्या उबदार स्पर्शानं तुझं मन सैरभैर होईल,
तुझ्या एका होकाराने!

कुणाला तरी प्रेम मिळेल,
खुप काळाची त्याची तहान भागेल,
त्याच्या आयुष्यातही एक परी असेल,
तुझ्या एका होकाराने!!!

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं
भरलेच डोळे कधी तर ओलं आसवानां पुसणारं !

कुणीतरी असावे
पैलतिरी साद घालणारं
शब्दानां कानात साठवुन गोड प्रतिसाद देनारं !

कुणीतरी असावे
चांदण्याच्या बरोबरो नेणारं
आंधारलेल्या वाटेत आपल्या सोबत येणारं !

कुणीतरी असावे
फुलासारखं फुलणारं
फुलता फुलता सुगंध दरवळणारं !

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं
पलिकडील किनार्‍यारुन आपली वाट पाहणारं !

ह्यालाच प्रेम म्हणतात ...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

प्रिये तुझ्या आठवणीत

प्रिये तुझ्या आठवणीत
मला चार टाके पडले रक्त वाया न घालवता
मी त्यानेच प्रेमप्रत्र खरडले
या सगळ्यात डोक्टरने मात्र चारशे रुपये लाटले
प्रिये मी सारचं वसुल करणार आहे
पण त्याआधी तुझ्या आठवणीत
मी एक झाड लावणार आहे
तु माझी झालीस की त्या झाडाची
गोड गोड फळ मी चाखणार आहे
पण तु माझी झाली नाहीस तर ते झाड
मी कापुण माझे चारशे रुपये वसुल करणार आहे
प्रिये तुझ्या आठवणीत मी एक प्रेमप्रत्र लिहणार आहे
त्यासाठी आभाळाचा कागद
अन समुद्राची शाई मी वापरणार आहे
तुझा नकार असेल तर माझा कागद मला परत दे
मी त्यावर पाणी तापवणार आहे
प्रिये तुझा नकार मिळाल्यावरही
तुझ्या आठवणींची आठवण येणार आहे
थोडा वेळ दुखः व्यक्त करणार आहे
अन लगेच दुसरीच्या शोधात फिरणार आहे

नकळत तिची आठवण आली.....

नकळत तिची आठवण आली.....
असाच एकदा एकांतात बसलो असताना........

नकळत तिची आठवण आली,
अन् डोळयांसमोर जणू तिची प्रतिमाच तयार झाली.....

तिला पाहून......

मनाला खुप काही बोलायचे होते,
पण ओठातुन शब्द निघत नव्हते......

डोळयांतही पाणी जमा झाले होते,
पण अश्रु गळत नव्हते.....

श्वासही अजुन चालू होता,
पण हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते......

बरेच काही विपरीत घडत होते,
पण मनाला काही कळत नव्हते.......

अचानक डोळयांवर सुर्याचे किरण आले,
अन् तिच्या प्रतिमेचे जणू दहनच झाले.......

क्षणभर काही कळलेच नाही,
मनाला मात्र वळलेच नाही.....

काही कळायच्या आधीच......

"ओठातुन तिचे नाव निघू लागले......
डोळयांतुन अश्रु गळू लागले.....
अन् हृदयाचे ठोकेही वाढू लागले...... "

पण.....
नकळत तिची आठवण आली.....

नकळत तिची आठवण आली.....

तू...

सर्व काही आठवणी आता कश्या मागच्या मार्गावर राहिल्यात..

पण तू अजुनही मनावर राज्य करतेस..


सारे काही विसरन्याच्या मार्गावर असताना


अजुनही तू एक हसू ओठांवर सोडतेस..

अजुनही वेडसरपना गेलाय नाही ..


शहानपण अंगि आले असुनही कुठेतरी


ह्रदयाच्या कोपर्‍यात तू तशीच आहे जशी होतीस ..

आधी कसे तू मी सोबत असताना वातावरण मंतारून जायचे ..


मिठीत असताना तू सारे मंद होउन जायचे ..


आजही खास असे काही बदलले नाही ..


बदलली ती मने फक्त .. बदलल्यात त्या वाटा फक्त ..

पण इतकाच हा बदलाव काफी असतो माणसांना माणसांशी तोडण्यासाठी...

आज उरलीत तितकीच श्वासे जितकी तू देऊन गेलीस ..


कदाचित आठवले तर आठव तुला दिलेले मी एक वचन ..


बस तितकेच माझ्या सोबत आहे ..


सारे काही कदाचित फार दूर राहून जाईल ..


आठवनिंना विसर आणि विसरतांना आठवणी येणारच ..


चुकलेल्या या प्रेमाच्या वळनाला एखाद्या जन्माला वळ्न मिळाणाराच ..


तू ज़ख्मा जरी दिल्यास तरी त्यावरही प्रेम असणारच ..


तुझ्या माझ्या झालेल्या चुकांना कुठेतरी माफ़ी होणारच ..


तू दूर कुठेही रहा पण अपी चेतन मधे आणि


माझ्या कवितांना मधे तुझा सहवास कायम राहणारच ...

फक्त दोन अक्षरं...

हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'

'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी

धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या

वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर

गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर

हवी होती फक्त दोन अक्षरं


--