╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Monday, March 8, 2010

वेळीच 'नाही' म्हणायला शिका!


'प्रेमा तुझा रंग कसा', या वाक्याचा अर्थ आपल्याला सभोवताली हातात हात घेऊन हिंडणार्‍या...किंवा एकमेकांच्या बाहूपाशात हरवलेल्या...किंवा एखाद्या समुद्रकिनारी एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या 'कपल्स'कडे पाहिल्यानंतर कळतो. प्रेमाचा रंग तसा गुलाबी! पण, तो अचानक कसा बदलेल, याचा मात्र काही नेम नाही. तो रंग बदलवणारे आपणच असतो. प्रेमामध्ये आपल्या मनाविरूध्द होत असेल तर एकदम 'नाही' कसं म्हणायचं? म्हणून...मन इथे कच खाते.

'त्याला' किंवा 'तिला' वाईट वाटले तर... 'तो' किंवा 'ती' दुखावेल... अशा अनेक गोष्टीचा आपण विचार करत असतो. त्यामुळे 'त्याने' किंवा 'तिने' म्हटल्यानुसार आपण वागत असतो. 'तो' किंवा 'ती' आपल्यावर आपल्या मनाविरूध्द असणार्‍या गोष्टीही आपल्यावर लादून 'हक्क' सांगत असतो आणि आपण इच्छा नसताही ते स्वीकारत असतो. परंतु, यात आपली चूक म्हणजे आपल्याला 'नाही' म्हणता येत नाही. अर्थात 'नकार' देता येत नाही. परंतु, प्रेमात मनाविरूध्द होणार्‍या गोष्टीना नकार दिलाच पाहिजे.

'तो' म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा... मोजकेच कपडे परिधान करत जा... केस कशाला वाढवतेस.... केस तू कापलेच पाहिजे. असा 'त्याचा' हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर 'एकत्र' आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो.



'तो' म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा... मोजकेच कपडे परिधान करत जा... केस कशाला वाढवतेस.... केस तू कापलेच पाहिजे. असा 'त्याचा' हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर 'एकत्र' आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् 'ती' मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला 'तो' सांगतो, तसं करावंच लागतं....


महाविद्यालयीन जीवनात प्रेमाची उधळण करणार्‍या तरूण-तरूणीमध्ये 'न'ची बाराखडी त्यांच्याच होणार्‍या वादाचे कारण बनत असते. त्यामुळे वाद होऊ नये म्हणून तरूण- तरूणी मन मारत एकमेकांचा शब्द खाली पडू देत नाही. त्यामुळे 'त्या' दोघांतील 'प्रेम' अधिक दृढ होण्याऐवजी गुंतागुंतच वाढत जात असते. त्यांना 'नाही' म्हणायची सवय नसते किंवा 'नाही' ऐकायचीही सयव नसते. त्यामुळे कमी वेळातच त्यांच्यातील नात्याला तडे पडतात व प्रेमाला कधी न सुटणारं 'ब्रेकअप'चं ग्रहण लागतं.

यातील महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला 'नकार' देता येत नाही. प्रेमातच काय तर कुठल्याच नात्यामध्ये 'नाही' म्हणण्यासाठी आपली जीभ रेटत नाही. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, याच विचारात आपण सगळा वेळ घालवतो आणि 'नाही' म्हणण्याची संधी गमावून आपल्या पायावर धोंडा मारून बसतो. मन मारत आपण 'होकार' देत आपल्या मनातल्या मनात झुरत असतो. परंतु, आपल्या या भूमिकेमुळेच नको ते घडते. पाणी डोक्यावर गेल्यावर हात पाय हलवण्याशिवाय पर्याय उरत नाही. मग, एकदाचा वैतागून नकार दिला जातो नि गाडी कायमची रूळावरून खाली उतरते. प्रेमात पडतानाच 'नाही' म्हणणे शिकणे महत्त्वाचं आहे.


'प्रेम' जुळते तेव्हा चांगला, वाईट असा भेद आपण करत नसतो. तर मग समोरच्याने आपण सांगितलं तसंच केलं पाहिजे हा आग्रह कशासाठी? प्रेमात आपण एकमेंकांना गुणदोषांसहित स्वीकारले असते. एकमेकांनी चांगल्या समन्वयाने आपल्यातील दोषांचे रूपांतर गुणांमध्ये केले पाहिजे. दोघांनी आपला स्वाभिमान शाबूत ठेवला पाहिजे.

प्रेमात मनाने आपण एकमेकांच्या जवळ आलो असतो तशी शरीराने ही जवळ येण्याची अपेक्षा असतेच. स्पर्शाची भाषा समजलेली असते. नको म्हणता म्हणता थोडं पुढे... थोडं मागे पाहत आपली प्रेमाची गाडी पुढे सरकत असते. अशा वेळा 'त्याला' किंवा 'तिला' नाही म्हणणं थोडं अवघडच जात असतं. 'नाही' म्हटलं तर 'तो' किंवा 'ती' आपल्याला सोडून तर जाणार नाही ना! अशा भीतीमुळे 'तो' किंवा 'ती' मन मानत नसतांना ही आग्रहाला बळी पडत असतात. भविष्यात त्याच्याकडून तिच्या व तिच्याकडून त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. त्यामुळे 'नाही' म्हणण्याची आपल्याला संधीच मिळत नाही. म्हणून रामायण घडण्याच्या आधीच 'नाही' म्हणणेच 'त्याच्या' किंवा 'तिच्या'साठी गरजेचे असते.

प्रेमाचा सिग्नल ओळखा!

LOve
'प्रेम' ही आपल्या मनातील अतिशय तरल भावना आहे. प्रेम एखादा कवी त्याच्या काव्यात व्यक्त करतो, लेखक कथेचे रूप देतो तर चित्रकार विविध रंगानी ते रेखाटत असतो. मात्र, आजचा आधुनिक प्रेमवीर स्वत:ला वाटेल तशा पध्दतीने ते व्यक्त करत असतो. प्रेमात दोघांकडून 'ग्रीन सिग्नल' असेल तरच ते फुलते. एकाच बाजूने सिग्नल म‍िळत असेल तर 'एक्सीडेन्ट हो गया, रब्बा रब्बा...' अशी म्हणायचीही वेळ येते. प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्याकडून मिळणारा सिग्नल हा 'ग्रीन' आहे किंवा 'रेड' आहे तो ओळखले पाहिजे.

आपण ज्या मुलीवर प्रेम करतो त‍िनेही आपल्यावर प्रेम करायला हवे, हा हट्ट धरणे योग्य नाही. कधी तरी ती आपल्या प्रेमाला समजून घेईल, सब्र का फल मिठा होता है, असे म्हणत आयुष्य घालविणारे 'देवदास'ही मोठ्या संख्येने आहेत. 'तो' किंवा 'ती' आपलं प्रेम समजून घेईपर्यंत किती जणांना आपण विनाकारण मनस्ताप देत असतो. असे विषय वास्तव जीवनात नाही तर एखाद्या कथेचे किंवा 'एक विवाह ऐसा भी', 'क्या यही प्यार है' या सारख्या चित्रपटांचे विषय होऊ शकतात. कारण कल्पनेच्या आधारे ते रंगविलेले असतात. 'जीवन' हे स्वप्नात जगता येत नाही, जीवन जगताना वास्तव परिस्थितीचे भान ठेऊन तिच्याशी सामना करावा लागत असतो. परंतु प्रेमाने पछाडलेल्या 'त्याला' व 'तिला' हे सांगेल कोण?

प्रेमात पडणारं वय हे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचं वय असतं. हे वय आपलं आयुष्य घडवत असतं तसं उद्‍धवस्तही करत असतं.
प्रेम हे केवळ एकच बाजून फुलत नसून दोन्ही बाजूंनी फुलत असतं. आपल्याला जर समोरच्या व्यक्तीकडून सकारात्मक संकेत मिळत नसेल तर त्याच्या विषयी प्रेम व्यक्त करून मनस्तापाशिवाय आपल्या पदरात काहीच पडणार नाही.

एकतर्फी प्रेमातून चांगलं घडण्याऐवजी वाईटच घडत असतं. प्रेमाच्या एका ऋतु मागून दुसरा ऋतू येत असतो. प‍िवळी झालेली पाने गळून पडतात तर त्या जागी हिरवी पालवी फुटते. प्रेम हे अचानक होत असतं, जबरदस्तीचा सौद्यात नेहमी घाटा सहन करावाच लागतो. आपला 'देवदास' होऊ नये म्हणून प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीत आपल्याविषयी प्रेम आहे किंवा नाही हे ओळखणे आवश्यक आहे.

प्रेम' पूर्व नियोजित नसते!

love
'प्रेम' हा काही प्रायोजित कार्यक्रम नही की, इच्छेनुसार केले अथवा इच्छा नसली म्हणजे थांबविला. 'प्रेम' मानवी भावना आहे. तिच्यावर कोणाचेही 'राज' चालत नाही. 'प्रेम' हे 'स्टॉप वॉच' तर मुळीच नाही. म्हणजे मर्जी असली की सुरू केलं व मर्जी नसली की बंद. 'प्रेम' तर अमृताचा झरा आहे. तो निरंतर सुरूच रहाणार आहे.

गालिब म्हणतात...

''प्रेम ऐसा आतिशी जज्बात है, जो सप्रयास लगता नहीं है और सप्रयास बुझता नहीं है।''

''यह तो बस, होता है तो हो जाता है। नहीं होता है, तो नहीं होता है।''


हिर- रांझा, लैला- मजनू, राधा- कृष्‍ण यांच्यातील 'प्रेम' हे पूर्व नियोजित नव्हतेच! त्याला इतिहास साक्ष आहे.

'
प्रेम' 'दिले से' होत असते. प्रेमात व्यक्ती नाही तर भावनांना महत्त्व असते. आपल्या भावना जुळल्या म्हणजे प्रेमाचे फुल अलगद उमल असतं. असे देश, धर्म, जाती, भाषा, परंपरा व संस्कृती यांची बंधने, मर्यादा झुगारून लावत असतं. प्रेमाची एक भाषा असते. प्रेम करणारे ती भाषा जाणतात, बोलतात. प्रेमात जात, चेहरा, वय पाहिले जात नाही तर मन पाहिले जाते.

'न उम्र की सीमा हो, न जन्म का हो बंधन,

जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन।'


मात्र, आजची पिढी... आज 'ही' तर उद्या 'ती' असा प्रेमाचा बाजार मांडताना दिसतात. गाढव प्रेमाचा खेळ खेळतात. त्यांचा क्षणाचा खेळ हा त्याच्या आयुष्यभराच्या वेदना होऊ शकतात, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

Saturday, February 13, 2010

फक्त एक होकार,..

फक्त एक होकार,
कुणाचं तरी जीवन बदलु शकतं,
जीवनाच्या गाडीत वंगण घालु शकतं,
कोणाचं तरी जीवन वेगवान करु शकतं!

तुझ्या फक्त एका होकाराने,
कुणाचं तरी रुप पालटेल,
आयुष्याचा रंग बदलेल
कदाचित वसंतही बहरेल!

एक कोमल नाजुक हात हातात येईल,
आपलं म्हणुन तुला कुणी मिठीत घेईल,
त्या उबदार स्पर्शानं तुझं मन सैरभैर होईल,
तुझ्या एका होकाराने!

कुणाला तरी प्रेम मिळेल,
खुप काळाची त्याची तहान भागेल,
त्याच्या आयुष्यातही एक परी असेल,
तुझ्या एका होकाराने!!!

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं
भरलेच डोळे कधी तर ओलं आसवानां पुसणारं !

कुणीतरी असावे
पैलतिरी साद घालणारं
शब्दानां कानात साठवुन गोड प्रतिसाद देनारं !

कुणीतरी असावे
चांदण्याच्या बरोबरो नेणारं
आंधारलेल्या वाटेत आपल्या सोबत येणारं !

कुणीतरी असावे
फुलासारखं फुलणारं
फुलता फुलता सुगंध दरवळणारं !

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं
पलिकडील किनार्‍यारुन आपली वाट पाहणारं !

ह्यालाच प्रेम म्हणतात ...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

प्रिये तुझ्या आठवणीत

प्रिये तुझ्या आठवणीत
मला चार टाके पडले रक्त वाया न घालवता
मी त्यानेच प्रेमप्रत्र खरडले
या सगळ्यात डोक्टरने मात्र चारशे रुपये लाटले
प्रिये मी सारचं वसुल करणार आहे
पण त्याआधी तुझ्या आठवणीत
मी एक झाड लावणार आहे
तु माझी झालीस की त्या झाडाची
गोड गोड फळ मी चाखणार आहे
पण तु माझी झाली नाहीस तर ते झाड
मी कापुण माझे चारशे रुपये वसुल करणार आहे
प्रिये तुझ्या आठवणीत मी एक प्रेमप्रत्र लिहणार आहे
त्यासाठी आभाळाचा कागद
अन समुद्राची शाई मी वापरणार आहे
तुझा नकार असेल तर माझा कागद मला परत दे
मी त्यावर पाणी तापवणार आहे
प्रिये तुझा नकार मिळाल्यावरही
तुझ्या आठवणींची आठवण येणार आहे
थोडा वेळ दुखः व्यक्त करणार आहे
अन लगेच दुसरीच्या शोधात फिरणार आहे

नकळत तिची आठवण आली.....

नकळत तिची आठवण आली.....
असाच एकदा एकांतात बसलो असताना........

नकळत तिची आठवण आली,
अन् डोळयांसमोर जणू तिची प्रतिमाच तयार झाली.....

तिला पाहून......

मनाला खुप काही बोलायचे होते,
पण ओठातुन शब्द निघत नव्हते......

डोळयांतही पाणी जमा झाले होते,
पण अश्रु गळत नव्हते.....

श्वासही अजुन चालू होता,
पण हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते......

बरेच काही विपरीत घडत होते,
पण मनाला काही कळत नव्हते.......

अचानक डोळयांवर सुर्याचे किरण आले,
अन् तिच्या प्रतिमेचे जणू दहनच झाले.......

क्षणभर काही कळलेच नाही,
मनाला मात्र वळलेच नाही.....

काही कळायच्या आधीच......

"ओठातुन तिचे नाव निघू लागले......
डोळयांतुन अश्रु गळू लागले.....
अन् हृदयाचे ठोकेही वाढू लागले...... "

पण.....
नकळत तिची आठवण आली.....

नकळत तिची आठवण आली.....

तू...

सर्व काही आठवणी आता कश्या मागच्या मार्गावर राहिल्यात..

पण तू अजुनही मनावर राज्य करतेस..


सारे काही विसरन्याच्या मार्गावर असताना


अजुनही तू एक हसू ओठांवर सोडतेस..

अजुनही वेडसरपना गेलाय नाही ..


शहानपण अंगि आले असुनही कुठेतरी


ह्रदयाच्या कोपर्‍यात तू तशीच आहे जशी होतीस ..

आधी कसे तू मी सोबत असताना वातावरण मंतारून जायचे ..


मिठीत असताना तू सारे मंद होउन जायचे ..


आजही खास असे काही बदलले नाही ..


बदलली ती मने फक्त .. बदलल्यात त्या वाटा फक्त ..

पण इतकाच हा बदलाव काफी असतो माणसांना माणसांशी तोडण्यासाठी...

आज उरलीत तितकीच श्वासे जितकी तू देऊन गेलीस ..


कदाचित आठवले तर आठव तुला दिलेले मी एक वचन ..


बस तितकेच माझ्या सोबत आहे ..


सारे काही कदाचित फार दूर राहून जाईल ..


आठवनिंना विसर आणि विसरतांना आठवणी येणारच ..


चुकलेल्या या प्रेमाच्या वळनाला एखाद्या जन्माला वळ्न मिळाणाराच ..


तू ज़ख्मा जरी दिल्यास तरी त्यावरही प्रेम असणारच ..


तुझ्या माझ्या झालेल्या चुकांना कुठेतरी माफ़ी होणारच ..


तू दूर कुठेही रहा पण अपी चेतन मधे आणि


माझ्या कवितांना मधे तुझा सहवास कायम राहणारच ...

फक्त दोन अक्षरं...

हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'

'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी

धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या

वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर

गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर

हवी होती फक्त दोन अक्षरं


--

दोन पाखरे

छान ते समोरचे झाड
त्याच्या झुकलेल्या फांदीवर बसुन
दोन पाखरे नेहमी किलबिल करायची
आणि तुलाही सवय झालेली
त्यांच्यात आपल्याल पहायची
असं आपलं नेहमीच सांगणं
आपलेही असेल असच एकच घरटं
झाडांच्या झुल्यावर झुलत राहणारं
पण तुझ्या हजार प्रश्नांवर
माझं नेहमीच गप्प राहणं कारण
एका फांदीवरच्या त्या पाखरांचं
घरटं मात्र एक नव्हतं
आपल्या दोघांची ही साथ
अशीच होती कारण ते प्रेम नव्हतं !!!

हिशोब प्रेमाच

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा
जमा खर्च एवढा पाहुण जा
तु मला दिलेलं घेउन जा
मी तुला दिलेलं देउन जा


स्विट होममधे कित्येकदा खाल्ले
आपण कचोरी समोसे
आत्ता प्रर्यत नेहमी मीच भरत आलो
बिलाचे सर्व पैसे
आज अखेरचं जाउ पोटभर कचोरी खाउ
किमान या बिलाचे तरी पैसे भरुन जा


लेक्चर बड्वुन मी फर्स्ट शोचं
ऍड्व्हान्स बुकींग करायचो
अन् आठवड्यात एक तरी
नाटक किंवा सिनेमा दाखवायचे
नाटकाचे माफ करतो
किमान सिनेमाचे तर पैसे देउन जा


आपलं हे प्रेम प्रकरण
तुझ्या पैलवाण भावाला कळलं जेव्हा
एवढं बेदम ठोकलं मला
मी मरता मरता वाचलो तेव्हा
चार दिवस दवाखाण्यात, पंधरा दिवस अंथरुणात होतो तेव्हा
निदान भावाच्यावतीने तु माझी माफी तर मागुन जा


मी कुठुन तरी नोट्स मिळवायचो
परिक्षेच्या काळात मात्र तुला द्यायचो
मग तुला नेहमी फर्स्टक्लास मिळायचा
माझा मात्र एक तरी बॅकलॉक रहायचा
आता मात्र ऑल क्लियर व्हायला हवं
म्हणुनच माझ्या नोट्स मला परत देउन जा


आज जाता जाता तरी
आपल्या प्रेमाच हिशोब तरी पुर्ण करुन जा...

येथेच उभा आहे मी

तू येणार म्हणुन
येथेच उभा आहे मी
तू भेटणार या आशेवरच
जगत आहे मी
काय सांगू तुझ्याशिवाय
कसा मी जगतोय
रोज तुज्या भेटीच्या
आशेवरच जगाशी लढतोय
तू आज येशील उदया येशील
येवून हे जीवन प्रेमाने
बदलून टाकशील
तू दाखविलेल्या स्वप्नात
रमून आहे मी
तू येणार म्हणुन
येथेच उभा आहे मी
सार्यानीच सांगितलय
तुझी आश्या सोडून दे
नाहीच येणार तू
स्वप्न पहान सोडून दे
पण माहित आहे मला
शपथा तू तोडणार नाहीस
उशिरा क होईना
आल्यावाचून राहणार नाहीस
तू येणार म्हणुन
येथेच उभा आहे मी

आठवण...

नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासावीस होतं
मग त्याच आठवणींना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलंय माझं ते सौख्य...
पण तरीही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....

तू

तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ

नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ

तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ

पुन्हा जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ

नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ

ईच्छा

कधी मनाचे कधी स्वतःचे ऐकुन काही
मनात माझ्या येउन ती मज हळुच पाही .धृ.

तुझी आठवण तुझेच सारे भास मनाला
तुझीच स्वप्ने डोळ्यातुन या बरसत राही .१.

तुला पाहुनी स्मरते आणिक सुचते मजला
तुझे भाव अन कविता माझी बोले काही .२.

तु निघता सांडती अत्तरे तव वाटेवर
वाटेवरचा सुवास तव मज बोले काही .३.

तुला लाजुन झुरती आणिक तुटती तारे
तुझीच ईच्छा मागाहुन मग मनात येई .४.

प्रियकर

तुझ्या करांचा स्पर्श निरागस, नवथर व्हावा
न देह तेव्हा कैसा माझा कातर व्हावा ?

न मोह मजला इंद्रपुरीच्या रंभेचाही
मनात माझ्या तुझाच केवळ वावर व्हावा

कशास रागे भरसी, आहे प्रियकर मी तर
तुझ्या रुपाने बैरागीही बर्बर व्हावा

तुझे नि माझे मीलन व्हावे चांदणरात्री
सखे, न रेशिमपडद्यांचाही अडसर व्हावा

असे जगावे, मृत्यूचेही नेत्र भरावे
असे मरावे, जगण्यालाही मत्सर व्हावा

तुझ्याविना निष्फळ बागेचा मोहर व्हावा
'मिलिंद' केवळ तू सुमनाचा मधुकर व्हावा

प्रेम

प्रेमाच्या वेलीवर...
प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही
जीव जेवढा आपण लावावा...
तेवढा सर्व लावतात असे नाही

प्रेमासारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो
पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असे नाही

कुणीतरी म्हटलय प्रेमामध्ये हातावरील रेषांनाही....
आपल्या वाटा बदलाव्या लागतात, पण त्या वाटा बदलेपर्यंत...
सर्वच थांबतात असे ना

तू येशील का?

तू येशील का? येशील का?
होऊन एक कळी,
अन मी फुलताना,
माझ्यासंगे फूलशील का?
येशील का? येशील का?

एकटा तो झोका, एकटा तो मी,
एकटे आमुचे हिंदोळे
अन मी झुलताना
माझ्यासंगे झूलशील का?
येशील का? येशील का?

मेघ बरसतील कृष्ण, शमेल माती उष्ण
धुळकट धरती, सुगंध उधळील
अन मी भिजताना,
माझ्यासंगे भिजशील का?
येशील का? येशील का?

जनात कधी लढताना, मनात मी झुंजताना,
चुकेल जेव्हा एखादा, काळजाचा ठोका
अन मिठीत तुझी स्पंदने देऊन,
मला तू जगवशील का?
येशील का? येशील का?

दाटून येतील जेव्हा, आठवणी जुन्या
उघड्या पडतील तेव्हा, जखमा पुन्हा
अन त्या जखमांवर,
हलके फुंकर घालशील का?
येशील का? येशील का?

श्वासामागून श्वास, अक्षय यज्ञाचा ध्यास
ध्यास हा एकट्याचाच कधीपर्यंत?
अन यज्ञात माझ्या ह्या,
समिधा होऊन जळशील का?
येशील का? येशील का?

मी न तुला पाहिले, तू कोण कुणाची दुहिता,
मी एक मुक्त कलंदर, कोरतो नवी पायवाट,
अन दोन पावली पायवाट,
चार पावली करशील का?
येशील का? येशील का?

कसला राजा ?

दूर देशी जाताना ती भेटली होती..
विसरणार नाही कधी तुला.. ती म्हणाली होती..
म्हणालो तिला आहे खरोखर तुझ्यावर विश्वास माझा..
जओन येतो परदेशी मग होईल तुझा राजा..
ती ही म्हणाली पाहीं मी वाट तुझी..
याच वाचनावर मी सार्‍या विश्वभर फिरलो..
तिच्यासाठी भेटी घेऊन माघारी आलो..
.... पण... परत आलो नि समजले..
मी तिचा कधीच नव्हतो.. राजा कसला,
मी तर तिच्या मनातही नव्हतो..

प्रेमाचा पुरावा

आभाळ ज़मिनीला टेकते
हा प्रत्तेकाचा भास आहे
कधीतरी ज़मिनीला टेकावे
हा आभाळाच ध्यास आहे
क्षितिज पहातांना
प्रत्तेकजन फसले आहे
खरे सांग मित्रा
तुला त्यांचे प्रेम कधी दिसले आहे

आभाळ आणि ज़मिनिचा
आहे जगती दुरावा
नीट बघ मित्रा
हाच तर खरा आहे

त्या दोहोंमधिल प्रेमाचा पुरावा .

प्रयत्न

तु दिसल्यावर तुझ्यापासुन लांब
जावेसे वाटत नाही....
पण लांब जायलासुद्धा तु
जवळ येत नाहिस


मी दाखवत नाही म्हणून
तुला माझ प्रेम कळत नाही...
आणि कळत असलं तरी..
तुही ते दाखवायचा प्रयत्न करत नाही...

तिच नाव काळजावर मोड़तांना....

माझाच मला विचार आहे
की का मी असा निष्ठूर बनलोए...
करुण विचार तिच्या दुखाचा
जगाच्या नजरेत पडलोए...

पण प्रत्येक गोष्टीचा संबंध
वास्तुस्तिथि शी लागत नसतो ...
सगराच्या भारतीलाही येथे
आवड़ता चन्द्र जवाबदार असतो...

मी जिवंत तिच्या विरहात
तिला कधी कळणार नाही ...
घात तर तिचा पण होईल
तो वर मी सुद्धा मरणार नाही...

एकदा जगलो जिच्यासाठी
तिला स्वतःवर मरतांना पहायच आहे...
मला तिने मारून काय अनुभवले होते
एकदा मला पण अनुभवुन पहायच आहे...

एक तिचचं तर नाव काळजावर
हजार वेला लिहून बसलोए ...
लिहतांना जितका हसलो नव्हतो
मोड़तांना तितका रडलोय ...

मला बघायच होत...

मला बघायच होत...
तुझ्या त्या बोलक्या डोळ्यात बघायच होत....

तुझ्या डोळ्यात बघून....
तुझ्या स्वप्नांच जग मला बघायच होत...

मला बघायच होत...
तूला तुझ्या गालावर आलेल्या बटे ला मागे करताना बघायच होत...

मला बघायच होत..
तुझ्या त्या गोड हसण्याला न्याहालुन बघायच होत..

तू रुसल्यावर
तुला लाडे गोडे लाउन तुला मनवायच होतं...

भेटायला आल्यावर..
मागुन हळूच येउन तुला घाबरवायच होतं..

तुझ्या गळ्यात...
माझ्या नावाच मंगलसूत्र घालायच होतं..

मला बघायच होत......
माझ्या आई बाबांची काळजी घेताना मला बघायच होत..

आपल्या दोघांच्या स्वप्नाना
वास्तवात आणायच होत..

तुझ्या नावापुढे....
लागलेल माझ नाव मला बघायच होतं..

तुझ्या कुशीत आपल छोटस बाळ...
तोंडात बोट घालून झोपलेल बघायच होत...

पण नियतीला काहीतरी वेगलच मान्य होतं..
नशिबात काहीतरी वेगलच लिहून ठेवल होत..

हे सार विधिलिखित होतं..
त्याच्या पुढे आमच थोडी ना चालणार होत..

पण आमच प्रेम खर होतं..
ह्यातच सर्व काही होतं..

पण खरच ग आपल्या स्वप्नाना..
वास्तविकतेची जोड़ देऊन मला बघायच होत..

मला बघायच होतं ग... मला बघायच होत..

सांगेन म्हणता म्हणता...!!!

पाहिलं तुला ज्यादिवशी
झालो तुझा दिवाना,
काय झाली माझी हालत
तुम्ही जरा पहा ना...!

काय झाला हो कहर,
जेव्हा भिडली ही नजर !
एक ह्रदय होते साधे,
ते राहिले ना माझे...!!!

अचानक एके दिवशी
आली ती मजपाशी,
"होशील का मित्र माझा?"
म्हणुनी लाजली जराशी

होकार देऊनी तिजला
आलो मी माझ्या घरला,
न अन्न-पाणी काही
मी ध्यास तिचा धरला...!!!

होई मग रोज भेटी
जिव माझा तिच्यात जडला,
'सांगू कसे तिला हे?'
हा प्रश्न मला पडला
प्रितीच्या नावेला आता
उफान मोठा चढला...!

सांगणार आज सगले
मी हे मग ठरविले,
'नाही' म्हणेल म्हणुनी
मनाने मज अडविले...

सोडुनी गेली जग हे
कळले अचानक मजला,
दिवा हा कसा रे
इतक्यात असा विझला...

कळता क्षणीच माझ्या
बसला मनास चटका,
असा कसा अचानक
झाला दगाफटका...

सांगणार होतो 'प्रीती'
हात घेउनी तुझा हाती,
सांगेन म्हणता म्हणता
सगलेच उरले बाकी....!!!

- -

पडायच असत प्रेमात कधी कधी

पडायच असत प्रेमात कधी कधी
या सुंदर जीवनात कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत
विचारात गुंतल्यासारख कधी कधी

अन पाहताना तिच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच…
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी

नंतर “जागली होतिस का रात्री?”
म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..
हात तिचा चोरुन कधी कधी

द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय तिचा निघाल्यावर कधी कधी

असते रागवायचे लटकेच
“अस काही नाहिये” म्हणून कधी कधी

विरहात तीच्या …
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी …

हारलो प्रत्येक वेळी

हारलो प्रत्येक वेळी , डाव तरी ना मोडला
बोल , मी नशिबास माझ्या बोल केव्हा लावला ?

एकदा कधी चुकीने , भाग्य आले भेटण्या
बावरोनी मीच माझा चेहरा हा झाकला !

सोडुनी घर आपुले , ना कधी आलीस तु
रडुनी अनिकेत मी , संसार माझा मांडला !

यातनांची दीर्घ यात्रा , चालता थकलो जरी
ना तुझ्या दारात केव्हा मी विसावा याचिला !

हार माझी हार होती , मानिले मी लाखदा
मी तसा नव्हतो हुतात्मा , हारता जो जिंकला !

प्रेम करतो तुझ्यावर...

प्रेम करतो तुझ्यावर...
तू पण माझ्यावर करशील ना...?

मी विचारलेल्या प्रश्नाचं....
होकारात उत्तर देशील ना...?

स्वप्न पूर्ण करताना..
हात तुझा देशील ना...?

नको करूस प्रेम....
मैत्री तरी करशील ना...?

मैत्री नुसती करू नकोस...
शेवट पर्यंत निभावशील ना...?

मैत्री कधी तोडू नकोस..
ह्या वेड्याचा जिव जाईल ना...!!

मैत्री तोडल्यावर..
मला विसरणार तर नाहीस ना...?

कधी चुकून भेटलो तर....
नुसती ओळख तरी देशील ना..?

मी मेल्यानंतर....
दोन थेम्ब अश्रु तरी काढशील ना...?

-

तुला विसरु कसा??

हसतेस एवढी छान की...
हसत रहायला शिकवलेस तू...

बोलतेस एवढी की...
बोलत रहायला शिकवलेस तू....

लाजतेस एवढी छान की...
मला आवडायला लागलीस तू..

जीव एवढा लावलास की..
प्रेम करायला लावलेस तू...

किती प्रेम करतेस तू??
एवढ प्रेम नको ना करूस...

मग काय झाल अचानक??
सोडून का गेलीस तू??

गेलीस तर गेलीस ...
पण
तुला विसरु कसा??
हे शिकवायला विसरलीस बघ तू!!

ए!! ते शिकवायला तरी परत येशील ना ग तू??

-

कसला हा खेळ खेळलास

कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु....?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु...

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास

युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास



-

काय करशील तेव्हा

" काय करशील तेव्हा "
एकमेकाना आहे एवढी माहीती
की प्रेम करतो एकमेकांवरती
आव् केवढा आपल्या दोघाचा
एकमेकवर एकमेकाचे प्रेम् नसल्याचा
वाटते भिती मला तुला विचारण्याची
असलेल्या मैत्रिपासुन दुर जाऊ याची
तुला भिती वाट्ते कशाची तर
आपले प्रेम् व्यक्त करु नये याची
म्हणतेस आपण प्रेम् ज्यावर करतो
मनातच नेहमी रहावा आपल्या तो
ते तितके खरे जरी असले
आयुष्य जगताना चालत नाही असले
तु माझ्यासाठी थांबशील हे नक्की
मी ही थांबेल ही गाट बांध तू पक्की
जरी थांबलो आपण एकमेकांसाठी
नाही थांबणार वेळ आपल्या दोघांसाठी
काय करणार आहेस प्रेम बाधुन उराशी
नसु जेव्हा आपण एकमेकांपाशी

मला तु हवी होतीस

मला तु हवी होतीस
साथ हवी होती मला तुझ्या सोबतीची
सम्पुर्ण आयुष्य जगण्यासाठी
हे जग जिंकण्यासाठी
साथ हवी होती मला तुझ्या सोबतीची
कवेत निवांत झोपण्यासाठी
थोडे तुझे... माझे वाटुन घेण्यासाठी
साथ हवी होती मला तुझ्या सोबतीची
मन आपली मोकळी करण्यासाठी
सुख... दुःखाचे अश्रु गाळण्यासाठी
साथ हवी होती मला तुझ्या सोबतीची
फुलातील मध चाखण्यासाठी
काहीसे मलाच समजुन घेण्यासाठी
साथ हवी होती मला तुझ्या सोबतीची
पावसात भिजत जाण्यासाठी
पावसात पडलेल्या गारा वेचण्यासाठी
साथ् हवी होती मला तुझ्या सोबतीची
संसार आपला थाटण्यासाठी
माझ्या मुलाची आई होण्यासाठी..........

बघ मी वेडा नाही.....!!!



मी रात्रीच्या मंद हवेत एकटा बसून कधी
असाच आपला सहज म्हणुन वर आकाशात बघतो,
चांदण्यांची धडपड अशी आसुसल्या नजरेनी पाहून,
मलाच उमजत नाही मी काय करत असतो?...

चंद्र कधी नभाआड़ जातो
तर कधी पूर्ण असतो चक्क प्रकाशित,
पण चांदण्या मला चंद्राच्या नेहमी दुरच दिसतात
नजरही बनाते क्षणात संकुचित...

काही तरी तशात आठवते अन् मन खिन्न होवून जाते
दुरून काही तरी नको असलेल, डोळ्यांसमोर रूप घेते...

तरीही मी आकाशात बघन्याच सोडत नाही
अणि हसतो हळूच जेव्हा आठवते मला काही...

मी का असा वेडा?, चंद्र चांदण्यांचा खेल पाहण्यात दंग
का कुणास ठावुक, का करतो या एकांताला मी संग?

असो तरिहि रात्रीच्या मंद हवेत एकटा बसून कधी
असाच आपला सहज म्हणुन वर आकाशात बघतो,
चांदण्यांची धडपड अशी आसुसल्या नजरेनी पाहून,
मलाच उमजत नाही मी काय करत असतो?...

एक सांगू? मला कारण तस माहिती आहे
पण..मी वेडा नाही ...

अग तूच तर म्हटला होत न...
"जेव्हा कधी माझी आठवण येइल
तेव्हा वर आकाशी बघशील,
मी नेहमी तुझी चांदनी बनुन तुझ्या सोबत राहीन....."

आत्ता कळल मला ,मला चांदण्या चंद्राच्या दुरच का दिसतात...

बघ मी वेडा नाही.....!!!

पाऊसरुपी तू...

अशाच एका संध्याकाळी, पावसाशी भेट झाली
थोडं मी बोललो, अन् लगेच जवळीक झाली...

तो नेहमी नवा असतो, नव्या नव्या गोष्टी सांगतो
माझं मन जाणून घेण्यासाठी, नेहमीच हट्ट मांडतो...

मी ह्मणालो नको करु पर्वा माझी, मी तुला काय देणार
गरजत गरजत तो ह्मणाला, मी नाही कधीच मागणार...

आजही तो मागत नाही, मनातील दुःख दाखवत नाही
पण सुख-दुःखात माझ्या, मला कधीच एकटं सोडत नाही.......

पाउस, ती आणि बावळट....!

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!

"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."

ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"

बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!

कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!

अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!

स्वप्न आठवून हसलो जरासा
कॉलेजात जेव्हा दिसली राणी,
मैत्रिणींशी थट्टा करत
मला ती 'बावळट' म्हणुन गेली...!!!

वाट धुक्यात हरावालिये ...

तुझी वाट धुक्यात हरावालिये ...........
मला खुप बोलायच होत,
अन तुज्यासंगे चार पावल चालायच होते,
तुजबरोबर आयुष्याच स्वप्न रंगवायाच होत,
अन त्या रंगात मनसोक्त बगादयाचा होत ,

आजही वाटत वेळ नाही गेली,
कदाचित , तुझ्यासाठी अजुन योग्य वेळ नाही आली ,
पण माझाच मी अंत पाहू किती?
अन तुझ्या न परतून येण्याच्या वाटेवर उभी राहू किती?

माझ जगन हेच माझ्यासाठी एक कोड झाले,
अन म्हनुनच तुझ नाव निघाल्यावर chidan हे फक्त निमित्त झालय,
का विचार करते तुझा , हा विचार त्रास देतोय,
तू भावनांशी खेलालास माझ्या, हे समजावून घेन अवघड jataay ,

कोनाच चुकल? आणि काय चुकल? हां विचारच सोडलाय,
माझिया मानत मीच आज दुफलिचा डाव मांडलाय,
जगासमोर मी खुशिच ढोंग करते,
कस sangu तुला ekatyat मी किती आक्रन्दते,

तू काय विचार करत असशील ?
तू मजसम तिलतिल टूटल असशील?
हा प्रश्नच व्यर्थ,
अन त्याच उत्तरही व्यर्थ,

माहित आहे .....तुझी वाट धुक्यात हरावालिये,
अन ........माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............
माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............
माझ्यासाठी ती शोधन तूच अवघड बनावालिये ............

पाऊस

धुंद पावसासारखे कुणी तरी यावे
ध्यानीमानी नसताना नकळत भिजवूनी जावे

तो बेधुन्ध व्हावा तिच्या आंगी स्पर्शताना
थेंब ही हर्शावे मग लपंडाव खेळताना

तिची ओली नजर बाणा सारखी सुटावी
थेट काळजाचा वेध घेत काळजाचे तुकडे करावी

हळूवार हसावी रस्त्यात चालताना
वारा ही निदर मग तिला छेदाताना

अशी असावी ती जणू थंडगार वारा
कोकण गावातील बरासाणार्‍या गारा

ओल्या मातीचा सुगंध पावसात मिसळावा
आणि मग माज्या सवे भिजताना
माज़ा पाऊसही भिजावा

---

Friday, February 12, 2010

बहारो फुल बरसावो...

तुला काय माहित मी तुझ्या साठी काय काय केलंय..
कोणी नाही तेवढ मी तुझ्यासाठी सहन केलंय..

तुझ्या बापानी तर मला कुठचाच नाही सोडला..
त्याने अगदी मला साबणा विनाच धूतलाय..

बघ ना तुझ्या प्रेमात मी किती बदललोय..
साबण विनाच्या धुवण्याने मी किती उजळलोय ..

तुझ्या भावाने तर अगदी कहर केलाय..
जिथे भेटलोय तिथे त्याने मला कूटलाय..

म्हणतात प्यार मे दिल मे दर्द होता है ..
आयला एक जागा नाय जिथे दर्द नही होता है..

बापाने कधी कधी गटाराच्या वा~या घडवून दिल्यात...
आयला उंदीर आणि घुशी पण ओळखीच्या झाल्यात..

नर्स आणि डॉक्टर माझ्या ओळखीचे झालेत...
वार्ड बॉय तेवढे व्हायचे राहिलेत..

खरच ग तरी तुझा नाद नाही मी सोडला..
करीन तर तुलाच हा निश्चय मनाशी पक्का केलाय..

एक दिवस तर कहर झाला..
मला पाहून वार्ड बॉय ओरडला..

अरे खाट तयार ठेवा एक दिवाना आशिक आलाय ...
नेहमीचा कस्टमर आलाय....

बहारो फुल बरसावो..
किसीका का मेहबूब फिर मार खाके आया है..

--

एक वेडा कवी...

एक सुन्दर चाफेकळी...

म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..
हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..
सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..
ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

मी शोधतोय तुला अजुन ...

मी शोधतोय तुला अजुन ...
पाण्या च्या तरंगावर,
वार्‍या च्या झुलुकेवर,
फुलांच्या पाकळीवर,
मी शोधतोय तुला अजुन ...

माती च्या गंधात,
वेलींच्या बंधात,
सोनेरी उन्हात,
गवताच्या पानावर,
द वा च्या थेंबात ...

मी शोधतोय तुला अजुन ...

पाण्याच्या काठी,
म उ म उ वाळूत,
मावलत्या सूर्याच्या
बूडणा र्‍या बिंबात,
मी शोधतोय तुला अजुन ...

डोळ्यातल्या पाण्यात,
मीट लेल्या ओ ठ् त,
नाव तुझे घेताच,
जागीच थी जून,
मी शोधतोय तुला अजुन ...

कधीतरी भेटशील ना मला?

मी शोधतोय तुला अजुन ...

माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे

माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे
आठवत त्या मुसळधार पावसामधे
तु चिंब भिजून गेली होतीस
अन ओलेल्या मनाने मला बिलगून
शांतपणे निजून गेली होतीस

खरच सांगतो त्या पाण्यामधे
माझ काळीज बुडत आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे

वाटत कधी कधी मनातली बात
तुला कशी सांगून टाकावी
अन ह्र्दयाची गाठ
जमलच तर बांधून टाकावी

तूच समजाव माझ्या मनाला
कारण तुला कळतं आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे

ति जेव्हा दिसते तेव्हा...

ति जेव्हा दिसते तेव्हा...मी रोकेल चा रांगेत उभा असतो
बिन बाहीच्या मळक्या बनीयान नेमका माझ्या अंगत असतो
गटारितल्या वळनाची छाप माझ्या तिरप्या भांगामधे असते
तरीही स्टाइल माझा शाहरुख खान वानी धुमशान दिसते

सायंकाली ति दिसते त् माझा हाती दळण असते
मांगे तिची आई अन समोर नाली वरच्या गड्यातले वळण असते
नालीवरती बैलेंस करून मी तिला हात देतो
डोक्यावरचा पीठाचा डब्बा निम्मा अंगावर सांडवुन घेतो
माझा काळा चेहरा मग पीठामुळे पांढरा फकट दिसतो
तिच्याकड़े बघतान्ना आमिर पण मग शाहरुख़ सकट असतो

रात्रीच्या वेळी मग जिम मारतान्ना..... खिडकित ती येउन रोज बसते
ओढ़नी आपली कुरवाळित ...माझा फाटक्या मसल्स वर जणु हसते
तिला पाहून एकT तिर्प्या डोल्यान्न ...मग भारी वजन उच्लाव वाटते
उचलतान्ना वजन मग... सलमान भाऊ माझा शरीरात साठते

तिच्या कड़े कुणी पाहीन इतका कुनात दम नाही
मोहल्ल्यात भाऊ इथं .....आपला बी वट काई कम नाही
बारीक़ जरी असलो तरी आपल्या सारखी कुणाची स्टाइल नसते
पण तिने हाक मारली त्या दिवशी नेमका नाकात शेम्बुड असते

कसं बनवाव ईमप्रेशन मला काई कळत नाही
आपल्या ''फुल जिम बोडी स्लिम'' वर ... ते पोट्टी मरत नाही
बोडी बनवून नुसती काई जर... पोट्टी भाऊ पटली असती
तर ऐशवर्या राय आज प्रिये अमिताभ बच्चन ची सुन नसती


---

तुला जेंव्हा माझी गरज भासेल

तुला जेंव्हा माझी गरज भासेल,
आज जरी तुला माझी गरज नसली,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,
तुला नवा मित्र मिळाला जरी असेल,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,

कबूल आहे माझे प्रेम होते तुझ्यावर,
मैत्री असे नाव होते त्याला नेहमी,
तुला जेंव्हा माझी गरज भासेल,
तेंव्हा फक्त मनोमनी हाक मार,
मी धावत फक्त तुझ्यासाठी येइल,
कारण तेंव्हा ही मी तुझाच राहिल,

कदाचित मी नव्हतोच कधी तुझा,
मी होतो फक्त माझाच माझा,
नंतर समजले मी झालो होतो तुझा,
तोवर तू राहिली कुठे होतीस माझी,
नवा पुरता राहिली मैत्रिण माझी,

आज जरी तुला माझी गरज नसली,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,
तुला नवा मित्र मिळाला जरी असेल,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,

सांग कशाला आलास तू???

उजाड़ होते जीवन माझे,
किती परी ते छान होते,
होते माझी मीच एकटी,
सुख किती परी तयात होते,

नाही वाटली ओढ़ कुणाची,
जवळी नव्हते जरी कुणी,
नाही लाभले प्रेम कुणाचे,
नव्हती तयाची खंत मनी,

जीवनात परी तू माझ्या येता,
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला,
जीवनसाथी मानून तुजला,
गोफ नवा मी त्वरे गुंफला,

धागा परी मध्येच तोडून,
सोडून मजला गेलास तू,
जायचेच जर अखेर होते,
सांग कशाला आलास तू???

--

खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा
तू यौवनाची मुसमुसलेली कळा
चालविला ह्रुदयावर नजरेचा विळा
अजुन वाहे जखम ती भळभळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

तनुवर नौवारीचा वेढा
जणु तो मोरपिसाचा सडा
पाहुनी ह्रुदयाचा होई तो चोळामोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

यौवन बान्धे तुझी काचोळीची गाठ
त्यातुन डोकवी कोरी कोरी पाठ
सावरताना मी ग होतो क्षुल्लकसा पाचोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

गज-याचा सुगन्ध होतो भोवती गोळा
सान्गतो तनुचा भार असे कोवळा
हि बाला म्हणजे रती कुमारी सोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

मी काय करावे कवित्व यौवनाचे
शब्दान्चा खजिना अपुरा माझ्या वाचे
शब्दान्चे किती ग कण कण केले मी गोळा
खरच तू यौवनाची मुसमुसलेली कळा

-

तिची भेट...

आज प्रथमच तिला पहिल
मन वेडावुनच गेल,
एकाच नजरेत तिने
मला पुरत घायाळ केल,

गुलाबी गाल... हरीणिची ती चाल
मादक अशी तिची अदा,
काय सांगू मित्रांनो...
मी झालोय तिच्यावर फ़िदा,

एकटक पाहत बसलो
विसरून सर्व भान,
मिळताच नजरेला नजर
तिने खाली घातली मान,

तिच्याजवळ बोलायची
इच्छा खुप झाली,
कसलाही विचार न करता
सरळ तिचीच वाट धरली,

तीही थोडीशी पुढे आली
कदाचित तिलाही काही बोलायच होत,
काय सांगू मित्रांनो....
नेमक तेव्हाच आईने जागवल होत...

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!

रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,
अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्न मी करतो,
हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न मी करतो,
तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघलतो,

सुरु होतो आठावनिचा तो खेळ,
नाही रहात पुन्हा झोपायचा ताल-मेळ,

असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,
आणि स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,
खाडकन फुटावे,

कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,
तुझ्यावर येणार्या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो,

तू केलेल्या प्रत्येक चुकावर,
माफ़ी मी मागत होतो,
तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,
वेळोवेळी मीच रडत होतो,

तुझ्याकडून झालेली चुक तुला कधीच दिसली नाही,
माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही किम्मत राहिली नाही,

कामाचा दबाव आहे असे म्हणून,
तू माला टाळत होतीस,
पण या कारणा खाली,
तूच माझ्या पासून दुरावत होतीस,

काम तेव्हा मीही करत होतो,
माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,
वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे,
तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,

तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत गेलेले अंतर,
हे तर कधीच मिटले नाही,

दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,
तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,

आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,

प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,
पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...आठवण माझीही येइल मी गेल्यावर

-

प्रेम करायचे नाही, पुन्हा कधी फिरून!

प्रेम करायचे नाही, पुन्हा कधी फिरून!
का कळत नाही, पण नक्कीच काहीतरी होतंय!
वेड्या या मनामध्ये, बहुतेक कोणीतरी बसलंय!

आजकाल मला जरा लवकर जाग येते,
कॉलेजमध्ये जायची खूप घाई लागते!
नास्ता करायची सुद्धा मला शुद्ध नसते!
फक्त तिलाच पाहण्याची आस मनात असते!

कॉलेजमध्ये डोळे तिलाच शोधत असतात,
कॅन्टीन, कॅम्पस, क्लासरूम सगळीकडे फिरतात!
ती मात्र कुठेतरी अभ्यास करत असते,
मैत्रिणींच्या घोळक्यात कुठेच कधी नसते!

खूप खूप वाटत तिच्याशी कधीतरी बोलाव,
जवळ तिला घेऊन सार काही सांगाव!
मनातले भाव मात्र ओठावर कधीच येत नाही,
तिला जाऊन बोलण्याच धाडस कधी होत नाही!

समोर कधी आलीच तर डोळे आपोआप झुकतात,
माझे सेवक असूनही चाकरी तिची करतात!
शब्द सुद्धा तेव्हा माझ्याशी फितुरी करतात,
कुणास ठाऊक का, सगळे असे का वागतात!

कॉलेजमध्ये एकदा ती साडी घालून आली,
नव्या नवरीवाणी सजून-धजून आली!
पाहता क्षणीच तिला भान हरपुन गेले,
तिच्याच रुपामध्ये सारे विसरून गेले!

पण काल जेव्हा तिला मी त्याच्याबरोबर पहिले,
काळजातील स्वप्न खळकन तुटले!
आवाजसुद्धा होऊ दिला नाही मी तुटलेल्या काळजाचा,
मनातच दाबल्या भावना, वेड्या या मनाच्या!

खूप खूप ठरवले कि रडायचे मात्र नाही,
इथेसुद्धा डोळ्यांनी माझी साथ दिली नाही!
तुटून गेले हृदय, अन काळीज गेले चिरून,
प्रेम करायचे नाही, पुन्हा कधी फिरून!


-

पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!

नकळत तुझं मित्रत्व
मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं
माझ्या भावनांचं विश्व
तेव्हाच विस्तारलं होतं

तुला रोज बघणं
आयुष्यातली एक सवय बनत गेली
तुझ्या फोनची वाट पाहण्यात
संध्याकाळ माझी विरत गेली

तू समोर आल्यावर
शब्द सारेच पळून जायचे
तू गेल्यावर मग मात्र
काय काय सांगायचं होतं
याची आठवण करून द्यायचे

तुझ्या पहिल्याच हास्यात मी
पूर्णपणे डूबायचे आणि
आपल्या मैत्रीच्या वेलीला
आणखीनच जपायचे

मैत्री एवढी सुंदर असते
हे तुझ्या रूपाने जाणवलं
मनाला मोहवणाऱ्या प्रत्येक
गोष्टीत त्या वेळी तुझंच रूप दिसलं

धबधब्यासारखे दिवस वाहत
राहिले असताना तुझ्या सहवासात
मैत्री नकळत मागे पडली
आणि एक प्रेमांकुर उमलला मनात

स्वभाव तुझा मी रोज
पडताळून बघायचे
रोजच्या बोलण्यात मात्र
नवीनच अनुमान निघायचे

तू दिसला नाहीस कधी
तर मेघ डोळ्यात उतरायचे
आणि घरी परत जाताना
मला चिंब भिजवायचे

परत दुसऱ्या दिवशी तू
त्याच गोड चेहऱ्याने हजर
सगळं विसरून पुन्हा तुला
बघायला आतुर असायची नजर

पण सुखाची चाहूल दुःख घेतं
तसंच काहीसं झालं
मैत्री आणि प्रेम मिश्रित हे
नातं एका गैरसमजामुळे विरत गेलं

कदाचित चूक नव्हती
दोघांचीही ,पण जिद्द
होती ना आपापला इगो मिरवण्याची

मनातली ठसठस जेव्हा
खूपच तीव्र झाली
मैत्रीने एक पाउल पुढे
टाकलं ,आणि मी माघार घेतली

हो , मी माघार घेतली
आणि इगो सोडून दिला
कारण तू दिलेल्या दुःखापेक्षा
मला तू स्वतः जास्त मोलाचा वाटला

तू सुद्धा मनातलं किल्मिष
काढून टाकलस
आणि हसून मी तुझ्या
सोबत आहे , हे
दाखवून दिलंस ....

आता तू असतोस सोबत
म्हणून मी स्वतःवरच खुश असते
रोजचीच संध्याकाळ आता
अजूनच छान दिसते

वाटतं एकदा सांगून टाकावं
मनातलं गुपित सारं
दुसरयाच क्षणी जाणवतं
समजल्यावर सगळं तू
अजूनच दूर गेलास तर ?


मला माहित आहे रे ,
तुझ्या पसंतीत मी
कुठेच बसत नाही ,
पण काय करू , मन
असं धावतं कि थांबतच नाही

एकदा हो म्हणून तर बघ ,
तुझ्यासाठी पूर्णपणे स्वताला बदलेन
तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी
उचलून फक्त फुलंच त्यावर पसरेन

मला तुला आयुष्यात
खूप सुखी झालेलं बघायचंय
रात्री झोपशील ना जेव्हा,
तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं
समाधानाचं हसू , हळूच
डोळ्यांनी टिपायचय
....

माझ्या मनाच पाखरू...

माझ्या मनाच पाखरू,
उडे पन्ख पसरोनी,
त्याला कस आवरू आवरू,
खन्त वाटे मनोमनी

माझ्या मनाच पाखरू,
त्याला पन्खाचे आले बळ,
त्याला कस ग थोपवू,
मनोमनी उठे कळ

माझ्या मनाच पाखरू,
बोले मन्जुळ मन्जुळ,
त्याची गोड बोल्गाणी,
भीजवी कातळ कातळ

माझ्या मनाचे पाखरू,
कधी आकाशाला भीडे,
त्याची झेप भीवविते,
त्याले धरणीचे वावडे

माझ्या मनाचे पाखरू,
आज आले परतुनी,
त्याचे सारे पन्चप्राण,
जपले मनाच्या ओन्जळीनी

कुणी तरी असाव आपल

कुणी तरी असाव आपल
आपल्याला समजुन घेणारे
परक्या दुनियेत टोल जाताना आपल्याला सवार्नारे
तिरस्कराच्या गर्दित
आपल्यावर प्रेम करणारे
कुणीतरी असावा आपल
दुनियेशी लढताना
आपल्या बाजूने लाधानारे
कुणीतरी असाव आपल
आपली बाजू मांडनारे
संकुचित या भावनांमधे
मोठा मन असणारे
जीव घेनार्यांच्या या दुनियेत
आपल्या साठी जीव देणारे
कुणीतरी असाव आपल
चुकून डोळ्यात पानी आल तर
प्रेमाने पुसनारे
कुणीतरी असावे आपले ................ ( i think its incomplete)

तिच्या आठवणी

आज शांत एकांती
येति आज शांत एकांती
येति तिच्या आठवणी
आठवते सारे...सारे
गुणगुणले होते कुणी...
गुणगुणले होते कुणी----
मुग्ध कळी उमलली
उमलली तुझ्याचसाठी;
तुझ्याचसाठी वेडी कुणी!
तुझ्याचसाठी वेडी कुणी,
तुझ्या कळते नकळत;
कळते न तुला वेड्या,
गाते ती रे प्रेमगाणी!
प्रेमगाणी विरली अन्‌
अन्‌ आर्त सूर आता
उरलेले रेंगाळती---
आज शांत एकांती...
आठवते सारे...सारे
गुणगुणले होते कुणी...

गुणगुणले होते कुणी---
मुग्ध कळी उमलली
उमलली तुझ्याचसाठी;
तुझ्याचसाठी वेडी कुणी!
तुझ्याचसाठी वेडी कुणी,
तुझ्या कळते नकळत;
कळते न तुला वेड्या,
गाते ती रे प्रेमगाणी!
प्रेमगाणी विरली अन्‌
अन्‌ आर्त सूर आता
उरलेले रेंगाळती---
आज शांत एकांती...

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही..

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,
"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.


विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच ऊरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...

Wednesday, February 10, 2010

प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.

यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात......

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

अजुनही आठवतयं मला

अजुनही आठवतयं मला
तो लिंबोणीच्या फांदीचा झुला
त्यावर बसून हसत म्हणायचीस..
"मुर्खा, बघतोस काय झुलव ना मला.."

अजुनही आठवतयं मला
तो तुला आवडणारा पाऊस
मला विसरून म्हणायचीस,
"पावसा, बघतोस काय चिंब भिजव ना मला.."

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते फुलपाखरू
त्याकडे हात लांबवत म्हणायचीस..
"पाखरा, बघतोस काय तुझ्या पाठीवर घे ना मला"

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते बेडकाच पोहणं
त्याला हुश्श करून म्हणायचीस..
"बेडका, पाण्याचा ठाव कुठे आहे सांग ना मला"..

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते सोनचाफ्याच झाडं,
त्याला पाहुन लाजून म्हणायचीस..
"चाफ्या, माझ्या लग्नात तुझ्या फुलांची माळ घालीन त्याला.."

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारा तो बर्फाचा गोळा..
तो खाताना ओठांवरून जिभ फिरवत म्हणायचीस..
"गोळावाल्या, अजुन थोडासा गोड कर ना याला"

अन आजसुद्धा तु तशीच आहे,
हे पानीपुरी खाताना पाहीलं
अन तेव्हा माझं मन खरचं,
तुझ्या त्या छकुल्या कुशीला कवटाळत राहीलं.


मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही

बोलायच खुप असत मला

बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.......
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.....
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही............
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही...........
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही........
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही............
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत

बघ माझी आठवण येते का??

बघ माझी आठवण येते का??
मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.

घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.
मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.
बघ माझी आठवण येते का???

आता कुठॆ सुरवात ही झाली.................

आता कुठॆ सुरवात ही झाली.................
मानात नकार आणि ऒठावर हॊकार
वॆळ पडली कि घॆतलि माघार
जगाची कॆली त्यानॆ रित स्विकार

हॊतॆ गाठायचॆ यशाचॆ शिखर
सुरु झाली त्याचि धडपड,
गॆला जीव कुणचा न कॆली फिकर

हॊती त्यास कुणाचि परवा
न राहिलॆ जगाचॆ भान
जिंकित गॆला तॊ नॅहमिच
चढला मग त्यास गुमान

पादाक्रांत करीत गॆला एक एक टप्पा
प्रॅमाच्या झाल्या नुसत्याच गप्पा
वापरलॅ त्यानॆ तिलाही नॅहमी
प्रॅमाच्या हॊता डाव फसवा

म्हणतात प्रॆम आंधळॆ असतॆ
तिहि कुठॆ अपवाद हॊती
सवॅ काहि दॆऊनि
राहिली रीत्या हाती

कळाली तीलाहि जगाचि रित
शॆवटचा डाव तिनॆ खॆळिला
उत्तुंग शिखराचा मॊह त्यालाही पडला

लाविलॆ पणास सवॅ,खॆळली शॆवटचि बाजि
कळायला झाला उशीर गमावलॆ सवॅ काहि
हपापलॆलॆ चॆलॆहि माग दुर झालॆ
हॊती आता खरी परिक्शा

मनातुनि आवाज आला
दिली साद मग त्यानॆ तीला,
नॆहमी प्रमाणॆ ती आलि
घॆउनि हातात हात म्हणालि
आता कुठॆ सुरवात ही झाली

आलाय प्रेम आणि विश्वासाचा हा उत्सव गुलाबी..

आलाय प्रेम आणि विश्वासाचा हा उत्सव गुलाबी..
आनंदाचे इन्द्रधनु उमटो तुझ्या आयुष्याच्या नभी..

प्रेमाने सजो तुझे जीवन..
जसे पारिजातकाच्या सडयाने फुलते अंगण..

मिळो तुला ती नजर,जी करेल तुझ्या ह्रदयात घर..
साथ निभाव नेहमीच,नको करु दुनियेची फिकर..

गुलाब आणि गिफ्ट्स ही होतील जुने..
अंतकरणातून साद दे,जोड तू मने..

स्वीकार तू नकार ही,जे असेल तुझे..ते तुला मिळेलही
ऐक पण..
'प्रेम दिन' जरी एक दिवसाचा..
'ख-या' प्रेमाचा उत्सव जीवनभराचा..

"विरहात तुझ्या ..."

"विरहात तुझ्या ..."
विखुरले गं क्षण सारे
रिक्त झाली आज माझी ओंजळ
तु मात्र गेलीस निघुन अशी
ओठी तव ते हास्य प्रांजळ..!!!

चाहुल तुझ्या प्रेमाची लागली,
मन माझे झाले दिवाणे....
गेलीस निघोनी आज अशी
लुप्त झाले सारे तराणे..!!!!

ना राहिली वेळेची खबर मज आता
ना आता राहतो काळाचा पत्ता
तुला का असावी जाणीव याची
ह्रदयी माझ्या अजुनही तुझीच सत्ता..!!!

फरफट होऊ लागली गं माझी,
तीळ-तीळ तुटलो गं मी,
तुच शिकवलेस प्रेम मला
सांग कुठे नेमका पडलो कमी...??

जाशील अशीच अजुन दुर तु,
होशील नव्या जगी तु रममाण,
काळही चालत राहील,जगही धावेल
मी मात्र राहीन असाच निष्प्राण, असाच निष्प्राण....!!!

स्त्री काय आहेस तू...


स्त्री काय आहेस तू...

जिवाश्मांची वसूंधरा तू,
योवनाची कामिनी तू,
हिमतीची वाघिनी तू
कुळाची स्वामिनी तू...

आकाशी धगधगती सौदामिनी तू,
ओलावून बरसणारी श्रावणी तू,
उन्हात गारव्याची सौमिनी तू,
थंडीच्या शहार्‍यात उबेची दुलई तू...

पतीची अर्धांगिनी तू,
लेकराची माऊली तू,
भावाची पाठराखीण बाहीण तू,
मैत्री जपणारी सखीण तू...

ज्ञानाचा प्रसार करणारी विद्या तू,
स्वरांची सुरेल सरस्वती तू,
शब्दातून जिवंत अशी कविता तू,
साहित्याचे जल वाहणारी सरीता तू...

चंद्राच्या अस्तित्वाला जागणारी पोर्णिमा तू,
चांदण्याच्या सहवासाला भावणारी अमावस्या तू,
वर आकाशी अस्तित्वातली नक्षत्र वैभवी तू,
आम्हास स्वप्नात घेवून जाणारी निद्राणी तू...

वस्त्रहरणातली पांडवधू द्रोपदी तू,
दृष्ट रावण लंका विध्वंस कारणी सीता तू,
सावळ्या कान्ह्याची यशोदा माय तू,
शृपणकेच्या अवतारतली एक हाय तू...

शिवबाची जिजाऊ तू,
राणी झाशीची बळकट बाहू तू,
पेशव्यांची आवड मस्तानी तू,
ताजमहालाची प्रेमळ निशाणी तू...

पौराणातली आदिशक्ती तू,
प्रभुची नितांत भक्ती तू,
सळसळत्या मावळ्यांची जय भवानी तू,
राक्षसांना बधणारी काली माता तू..

आजच्या युगाची प्रगती तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
कलेच्या क्षेत्रात नटराजाची मुर्ती तू,
खरचं सार्‍यांच्या यशाची किर्ती तू...

तुज वाचून न कुठला जीव,
तुजवाचून ना कुठली नीव,
वंदितो तुला हे स्त्री शक्ती,
कारणी आजही तुजवाचूनी
ना कुठला इंद्र ना कुठलाच शिव....

ना संपणार तुझे अस्तिव,
ना तू विरळ होणार,
तुझवाचून हे विश्व आपूले,
किती काळ टिकणार...

प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम करणं सोपं नसतं

सर्व करतात, म्हणून करायच नसतं

चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं

पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं

तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

शाळा कॉलेजांत असच घडतं

एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं

जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं

ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं

करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं

सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं

हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं

पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं

फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं

मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं

डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं

आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं

एवढ सगळं करणं खुप कठीण असतं

कारण प्रेम करणं सोपं नसतं................

चुक मी केली त्या क्षणी ..

चुक मी केली त्या क्षणी ..
तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी..

प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त..
पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त

मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती..
तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती ...

रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या ...
मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या ....

बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे..
तिच्या डोळ्यात पानी पाहून मन आनंदून जायचे..

झुगारून प्रेम तिचे, वैरी जालो मी तिच्या प्रेमाचा....
"नेहमी खुश रहा"..म्हणुन निरोप दिला तिने प्रेमाचा...

आज तिच्या आसवांची किंमत माला कलते आहे....
माझ्या आसवानी त्याची परतफेड मी करतो आहे.....

चुकलो, चुकलो मी म्हणुन मन माझे रडते आहे...
रोज तिला शोधण्यासाठी आकाश पाताल एक करतो आहे....

मैत्री जगायला आभाळाएवढं बळ देते !!

जेंव्हा जीवाचं शिवाला,
रंकाचं रावाला,
भक्ताचं देवाला,
न सांगताही कळलं जातं.
तेंव्हाच आपोआप...
मैत्रीचं नातं जुळलं जातं.

मैत्री मैत्री असते,
मैत्री जन्मदात्री असते,
मैत्री म्हणजे खात्री असते,
मैत्री म्हणजे पत्रापत्री असते,
मैत्री म्हणजे,
कधी तीची,कधी त्याची,
भर पावसात,
उन्हाळ्याच्या दिवसात,
दोघांत....
फक्त एकच छत्री असते.

मैत्री म्हणजे लुकलुकणारं चांदणं,
मैत्री म्हणजे हातावरचं गोंदणं,
मैत्री म्हणजे मना-मनातल्या
तणाचं वेळोवेळी निंदणं !
मैत्री म्हणजे,
एकमेकांच्या कुशीत स्फुंदनं !!

मैत्री रडवते,
मैत्री हसवते,
मैत्री सांगुन फसवते,
मैत्री मना-मनात नवा स्वर्ग वसवते !!

मैत्री विहिरीतला पारवा,
मैत्री रानातला सरवा,
मैत्री उन्हातला गारवा,
मैत्री मिसळीतला झणझणीत शरवा !!

राधेचा संग असते मैत्री,
मीरेचा रंग असते मैत्री,
द्रौपदीचे न उलगडलेले
गुढ अंग असते मैत्री.
कधी कर्ण दुर्योधनाच्या
प्रेमात दंग असते मैत्री.

मैत्री क्षणभर टेकायला हक्काचं स्थळ देते,
मैत्री लागेल एवढी कळ देते,
मैत्री जगायला आभाळाएवढं बळ देते !!

होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..

कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...

नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा

कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............!

पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा.............!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा,

मुली मुली मुली मुली

मुली मुली मुली मुली

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्‍या त्या मुली.
"मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून असलेल्या त्या मुली.
जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्यहलण्यासाठीच पडलिये आशय संभ्रमात वावरणर्‍या मुली.
मुली म्हणजे नाटणमुरडन.
मुली म्हणजे उगाच हसने.
(त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक कोट्या बौधहिक विनोद त्याना झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी काळत नाही
हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows, मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी......

असंही प्रेम असतं!!

असंही प्रेम असतं!!

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....

काय करु? काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....

थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....

थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...

म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?

आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?

मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....

मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!

विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'

.......मी निशब्द....

डोळ्यांत स्वप्न माझ्या ..


डोळ्यांत स्वप्न माझ्या ; ते साठवून जा तू ,
स्वप्नातलेच जगणे ; माझे शिकून जा तू .

श्वासात आठवांचा ; पाऊस दाटलेला ,
आताच आसवांचा ; घन बरसवून जा तू .

झाल्या तशाच जखमा ; आता मला नव्याने ,
डोळ्यांत आसवांच्या ; नुसता ढळून जा तू .

ना साहवे मला हा ; एकांत रोज आता ,
डोळ्यामधून माझ्या ; आता झरून जा तू .

रे जीवना तुझी मी ; केली नसे उपेक्षा ,
माझ्यासवेच माझे ; 'मरणे' जगून जा तू .

मैत्री म्हणजे.

मैत्री म्हणजे.......खांद्यावर हात
मैत्री म्हणजे.......सदैव साथ

मैत्री म्हणजे.......वाट पाहणे
मैत्री म्हणजे.......सोबत राहणे

मैत्री म्हणजे........एकत्र फिरायला जाणे
मैत्री म्हणजे........एकत्र आईस्क्रीम खाणे

मैत्री म्हणजे........सल्ले घेणे
मैत्री म्हणजे........मार्ग देणे

मैत्री म्हणजे........कधी राग
मैत्री म्हणजे........कधी भडकते आग

मैत्री म्हणजे........कधी खरी कधी खोटी
मैत्री म्हणजे........कधी पड़ते छोटी

मैत्री म्हणजे........आजचं सत्य
मैत्री म्हणजे........नसेलच नित्य

मैत्री म्हणजे........लिहावं तेवढं कमी
मैत्री म्हणजे........सुखातच साथीची हमी

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... मी बोलतच नाही

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील
*************************

"शब्दान्ची" गरज नसते,

"शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री


क्षणाक्षणाच्या सुतानी विणलेली,
ऊन-वारयाशी सारखी झुन्ज देणारी,
आपली शाल कायम राहु दे......

.......माझ्या आयुष्यात एक तुझी मैत्री ही अशीच राहु दे

मैत्री म्हणजे मायेची साठवण,

मैत्री म्हणजे मायेची साठवण,

मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण

हा धागा नीट जपायचा असतो,

तो कधी विसरायचा नसतो

कारण ही नाती तुटत नाहीत,

ती आपोआप मिटून जातात

जशी बोटांवर रंग ठेवून

फुलपाखरे हातून सुटून जातात...

ती माझी......माझीच फक्त आई आहे.

थेंब थेंब झिरपणारा ओलावा पिंपळवृक्ष बनून उभा राहतो, मी त्याला आई अशी हाक मारतो........
चला सलाम करू धन्य त्या मातेला...
----------------------------------------------
आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते अशक्य!!
तरी हा एक प्रयास आहे तिच्याच वाढदिवसाला छोटीशी एक भेट आहे ..
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......

मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
जिच्यामुळे मी, माझी कविता आहे
ती माझी......माझीच फक्त आई आहे.

एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय... एक प्रवास

भिती वाटते !

भिती वाटते !
तुझ्याशी खुप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भिती वाटते
तुझ्याशी खुप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भिती वाटते
तुझ्या खुप जवळ यावे वाटते
पण तोल सुतन्याची भिती वाटते
तुझा तो मन भुलवानारा चेहरा अस्वस्थ करतो
पण उत्तर देण्याची भिती वाटते
तुझ्या सहवासात मी नाही यायचो
तुला उणीव असते.
पण तू माझ्या आयुष्यात नाही
याची मला जाणीव असते
तुझी स्तुती शब्दात करावी वाटते
पण तुझ्यापुढे शब्द अपुरे पडतात
तुझ्यासाठी जग सोडावे वाटते
पण समाजाची भिती वाटते
तुझ्यावर प्राण अर्पण करावा वाटतो
पण आई - वडिलांची कालजी वाटते
तुझ्या याच गुनावर मी प्रेम करतो
पण तुला सांगायची भिती वाटते
तूच सांग सखे हे प्रेम आहे !
की मैत्री , तुला कट वाटते ?

तुझ्याच हृदयात राहायचं मला

तुझ्याच हृदयात राहायचं मला
तुझ्याच आवडीचं व्हायचंय मला
तुझ्या ओठातलं गीत व्हायचंय मला
तुझ्या संगतीत बहारायचंय मला
तुझ्यासाठीच जगायचंय मला
तुझ्या हृदयात राहायचंय मला

तुझ्या स्वप्नातील राजकुमार व्हायचंय मला
तुझ्या मनातील एक पान व्हायचंय मला
तुझ्या बरोबर राहून आयुष्याला नवीन वळण द्यायचंय मला
तुझ्या सुखातील जोडीदार
तुझ्या दु:खातील भागीदार व्हायचंय मला
तुझ्याच हृदयात राहायचंय मला

तुझ्यात गुंतून जायचंय मला
तुझ्याच नशेत डुबून जायचंय मला
तुझे सौंदर्य डोळ्यात टिपून ठेवायचंय मला
तुझ्यात हरवून जायचंय मला

आणि नंतर तुझ्यातच शोधायचंय मला
कसं सांगू मी तुला
तुझ्याच हृदयात रहायचंय मला

मैत्री

मैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....

एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालु लागतो...

नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...

मैत्री अशी होते..!

काय जादु असते मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...

कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....! ]

Tuesday, February 9, 2010

कॉफीची चव

Hello


त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो.
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"



Click Me! Click Me! Click Me!

ती डोळ्यांतुन खुदकन हसते

ती डोळ्यांतुन खुदकन हसते
अन गिरक्या लगबग घेते |
ओठांच्या शिंपलीवरती
इंद्रधनु सुंदर अवतरते ||
त्या नाजूक गालांवरती
फुलपाखरे किती भिरभिरती |
सायीच्या हातांमधुनी
प्रेमामृत नित पाझरते ||
मखमाल तिच्या स्मरणाने
जीव हलका फुलका होतो |
ममतेचे रेशीम धागे
ती असेच गुंफुनी जाते ||