स्त्री काय आहेस तू...
जिवाश्मांची वसूंधरा तू,
योवनाची कामिनी तू,
हिमतीची वाघिनी तू
कुळाची स्वामिनी तू...
आकाशी धगधगती सौदामिनी तू,
ओलावून बरसणारी श्रावणी तू,
उन्हात गारव्याची सौमिनी तू,
थंडीच्या शहार्यात उबेची दुलई तू...
पतीची अर्धांगिनी तू,
लेकराची माऊली तू,
भावाची पाठराखीण बाहीण तू,
मैत्री जपणारी सखीण तू...
ज्ञानाचा प्रसार करणारी विद्या तू,
स्वरांची सुरेल सरस्वती तू,
शब्दातून जिवंत अशी कविता तू,
साहित्याचे जल वाहणारी सरीता तू...
चंद्राच्या अस्तित्वाला जागणारी पोर्णिमा तू,
चांदण्याच्या सहवासाला भावणारी अमावस्या तू,
वर आकाशी अस्तित्वातली नक्षत्र वैभवी तू,
आम्हास स्वप्नात घेवून जाणारी निद्राणी तू...
वस्त्रहरणातली पांडवधू द्रोपदी तू,
दृष्ट रावण लंका विध्वंस कारणी सीता तू,
सावळ्या कान्ह्याची यशोदा माय तू,
शृपणकेच्या अवतारतली एक हाय तू...
शिवबाची जिजाऊ तू,
राणी झाशीची बळकट बाहू तू,
पेशव्यांची आवड मस्तानी तू,
ताजमहालाची प्रेमळ निशाणी तू...
पौराणातली आदिशक्ती तू,
प्रभुची नितांत भक्ती तू,
सळसळत्या मावळ्यांची जय भवानी तू,
राक्षसांना बधणारी काली माता तू..
आजच्या युगाची प्रगती तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
कलेच्या क्षेत्रात नटराजाची मुर्ती तू,
खरचं सार्यांच्या यशाची किर्ती तू...
तुज वाचून न कुठला जीव,
तुजवाचून ना कुठली नीव,
वंदितो तुला हे स्त्री शक्ती,
कारणी आजही तुजवाचूनी
ना कुठला इंद्र ना कुठलाच शिव....
ना संपणार तुझे अस्तिव,
ना तू विरळ होणार,
तुझवाचून हे विश्व आपूले,
किती काळ टिकणार...
0 comments:
Post a Comment