╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Saturday, February 13, 2010

प्रियकर

तुझ्या करांचा स्पर्श निरागस, नवथर व्हावा
न देह तेव्हा कैसा माझा कातर व्हावा ?

न मोह मजला इंद्रपुरीच्या रंभेचाही
मनात माझ्या तुझाच केवळ वावर व्हावा

कशास रागे भरसी, आहे प्रियकर मी तर
तुझ्या रुपाने बैरागीही बर्बर व्हावा

तुझे नि माझे मीलन व्हावे चांदणरात्री
सखे, न रेशिमपडद्यांचाही अडसर व्हावा

असे जगावे, मृत्यूचेही नेत्र भरावे
असे मरावे, जगण्यालाही मत्सर व्हावा

तुझ्याविना निष्फळ बागेचा मोहर व्हावा
'मिलिंद' केवळ तू सुमनाचा मधुकर व्हावा

0 comments:

Post a Comment