╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Thursday, July 30, 2009

शब्द म्हणजे काय असते ?
ओघळणारा झरा असते
सळसळणारा वारा असते
शब्द म्हणजे असतो डोंगर
कधी सुगंधी माती असते

शब्द म्हणजे प्रेम असते
शब्द म्हणजे माफ़ी असते
शब्द म्हणजे आठवणींची
भरलेली टाकी असते

शब्द कधी असती सुंदर
कधी हृदयास भिडनारे
शब्द असती रडता-रडता हसवणारे
शब्द असती हळूच जग दाखवनारे

शब्द म्हणजे असते न्यान
शब्द म्हणजे असते शान
शब्दामध्येच मोजले जाते
तुझ्या माझ्या अकलेचे परिमाण

शब्द कधी असती प्रेमळ
शब्द कधी बनती कठोर
शब्द कधी असती बोलके
शब्द कधी असती तुटके
शब्दामध्येच सामावली असतात
तुझी माझी सुख-दू:खे

शब्द म्हणजे काय असते ?
खरे सांगू ?
शब्दामध्ये दडलेल्या भावनाशिवाय
शब्द म्हणजे काहीच नसते
आणि हे समजुन घे माझ्या मित्रा
शब्दान्विनाही जग असते .

Monday, May 18, 2009

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….
गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….

खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….

खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….

खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..

खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……

कारण…..

प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……

एकच वेळ …!!


एकच वेळ …!!

मी तर केवळ दयेचा सागर
लोटा भर-भर वाहून घे ..
मी तर केवळ मायेचा सागर
एक डुबकी तरी मारून घे …!!

मी तर केवळ प्रकाश ज्ञानाचा
एकच अंधकार लावून घे
मी तर केवळ क्षणाचा भुंगर
एकदा तरी पाहून घे ..!!

मी तर केवळ प्रभूचा दास
एकच वेळ एइकून घे ..
तू तर आहे दासाचा दास
एकच वेळ ओळखुन घे ..!!

मी तर आहे भविष्याचा मार्ग
एकच वेळा चालून घे ..
मी तर आहे भूतांचा भुत
एकच वेळ जानूं घे …!!

मी तर आहे पाण्याचा झोत
एकच वेळ पिवून घे
मी तर आहे जीवनाचा मौत
एकच वेळ जगुन घे ..!!

मी तर आहे परमात्म्याशी समरूप
एकच वेळ उपकारून घे ..
मी तर आहे जादूचा चिराग
एकच वेळ फुकमारून घे …!!

समजुन घे मला…..


समजुन घे मला…..
तुझ्याकडे आता काही मागणे नाही…..
मन माझ तुझ्याकडे…
आता हास्य ही माझ नाही…
रिती ओन्जळ माझी…
दोन फुल ही आपली तुझ्याचकडे
बरसलेला श्रावण
आता कोरडी असलेली जमिन
सगळ तुझ्याचकडे……..

कधी तरी वळुन विचारीन मी तुला
सम्भाळुन ठेव…… माझी हि ठेव सारी
शेवटच समजुन घे मला……
तुझ्याकडे आता काही मागणे नाही…..

* मला तुला


मला तुला

जमल नाही मला, तुला विसरायला
जमल नाही तुला, आठवायला मला

कळल नाही मला, तुझ स्वार्थ जतन
कळल नाही तुला, माझ पवित्र मन

पटल नाही मला, तुझ फसवण
पटल नाही तुला, माझ केवळ प्रेम

ऐकल नाही मी, कधीच दुसर्यांच
ऐकल नाहीस तु, कधीच माझ

वळल नाही माझ, पाउल दुसरीकडे
वळल नाही तुझ, पाउल माझियाकडे

कंट्रोल+ अल्ट + डिलीट


कंट्रोल+ अल्ट + डिलीट

मला आठवत तु म्हटल होतस
वेगळे होवुया….
नको असलेल्या नात्याच
ओझ आता नको उचलुया….
किती सहज … चेह-यावरची रेष न हलवता….
बघत राहीले तुला क्षणभर….
अन चांदण्याच दिसल्या मला भर दुपारी…
काहीच कळेना…तु शांत काही रीअक्ट न होता
अन मग सारे सोपस्कार… कागदोपत्री
कुठलाही वाद नाही… प्रश्न नाही
शोधत राहीले मी उत्तरे न विचारलेल्या प्रश्नांची….

आज परत एकदा ..तु ..मी समोरासमोर….
आज तुला मी हवेय…. का???
एकटेपण सहन होत नाही…..
की शरीराची भुक संपत नाही…

विसरले नाही मी तुझ ते बोल…
आठवत तरी का तुला ते अंधुकस..???
येस…. आज मी तुला तेच सांगतेय….
”मी तुला केलय माझ्या जिवनातुन
कंट्रोल+ अल्ट + डिलीट!!! ”

Monday, April 27, 2009

मी परतणारा..

सुखस्पर्शी लाटा अविरत वारा
अफाट जल अथांग
आणी हा समुद्रकिनारा

भावनांचा उद्रेक कधी उदासीनतेचा मारा
मनी आठवणींचे काहुर
आणी पारवा भिरभिरणारा

एकांताचा खडक विचारांचा झरा
कल्लोळ दाटलेला
आणी माझ्यातला मी तळमळणारा

मिटलेले ओठ डोळे पाणावले जरा
भरुन येई ऊर
आणी सुर्य मावळणारा

मन शांत होईपर्यंत बसे मी त्या समुद्रकिनार्‍यापाशी
तो विचारे मग मला, येशील ना रे उद्या?
आणी मी परतणारा..

मैत्री असावी .........

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...

कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी

Wednesday, April 22, 2009

मला खुपदा प्रश्न पडतो...........

मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?

पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्‍या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्‍याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?

पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्‍याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्‍याला फुलविण्याचा
दुसर्‍याला आनंद देण्याचा........

मी....

Wednesday, April 8, 2009

वादळाच्या. ...........

"वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे

निळ्याशार पाण्यात मी
एकच बिंब पाहिले होते
वळून जेव्हा पाहिले तेव्हा
फक्त शब्दच उरले होते



याच किनारी बसून आपण
एक संध्याकाळ रंगवली होती
क्षितिजाला तेव्हा मी
हळूच हुलकावणी दिली होती

एकच साथ हवी होती
सोबत तुझ्या जगण्याची
हातामध्ये हात घेऊन
मॄगजळ पाहण्याची

किनारावर आजही मी
शांत उभा आहे
ओढून मला घेशील
याची वाट पाहत आहे

'आता माझे फक्त, एकच म्हणणे आहे
कधीही मला तू पुन्हा भेटू नकोस'

आता निदान थांबलो आहे
तेव्हा मी थांबणार नाही
माझे जीवन तेव्हा मी
माझ्या हाती ठेवणार नाही

म्हणूनच,
वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे"