╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Wednesday, February 10, 2010

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.... मी बोलतच नाही

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील
*************************

"शब्दान्ची" गरज नसते,

"शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री


क्षणाक्षणाच्या सुतानी विणलेली,
ऊन-वारयाशी सारखी झुन्ज देणारी,
आपली शाल कायम राहु दे......

.......माझ्या आयुष्यात एक तुझी मैत्री ही अशीच राहु दे

मैत्री म्हणजे मायेची साठवण,

मैत्री म्हणजे मायेची साठवण,

मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण

हा धागा नीट जपायचा असतो,

तो कधी विसरायचा नसतो

कारण ही नाती तुटत नाहीत,

ती आपोआप मिटून जातात

जशी बोटांवर रंग ठेवून

फुलपाखरे हातून सुटून जातात...

ती माझी......माझीच फक्त आई आहे.

थेंब थेंब झिरपणारा ओलावा पिंपळवृक्ष बनून उभा राहतो, मी त्याला आई अशी हाक मारतो........
चला सलाम करू धन्य त्या मातेला...
----------------------------------------------
आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते अशक्य!!
तरी हा एक प्रयास आहे तिच्याच वाढदिवसाला छोटीशी एक भेट आहे ..
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......

मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
जिच्यामुळे मी, माझी कविता आहे
ती माझी......माझीच फक्त आई आहे.

एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय... एक प्रवास

भिती वाटते !

भिती वाटते !
तुझ्याशी खुप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भिती वाटते
तुझ्याशी खुप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भिती वाटते
तुझ्या खुप जवळ यावे वाटते
पण तोल सुतन्याची भिती वाटते
तुझा तो मन भुलवानारा चेहरा अस्वस्थ करतो
पण उत्तर देण्याची भिती वाटते
तुझ्या सहवासात मी नाही यायचो
तुला उणीव असते.
पण तू माझ्या आयुष्यात नाही
याची मला जाणीव असते
तुझी स्तुती शब्दात करावी वाटते
पण तुझ्यापुढे शब्द अपुरे पडतात
तुझ्यासाठी जग सोडावे वाटते
पण समाजाची भिती वाटते
तुझ्यावर प्राण अर्पण करावा वाटतो
पण आई - वडिलांची कालजी वाटते
तुझ्या याच गुनावर मी प्रेम करतो
पण तुला सांगायची भिती वाटते
तूच सांग सखे हे प्रेम आहे !
की मैत्री , तुला कट वाटते ?

तुझ्याच हृदयात राहायचं मला

तुझ्याच हृदयात राहायचं मला
तुझ्याच आवडीचं व्हायचंय मला
तुझ्या ओठातलं गीत व्हायचंय मला
तुझ्या संगतीत बहारायचंय मला
तुझ्यासाठीच जगायचंय मला
तुझ्या हृदयात राहायचंय मला

तुझ्या स्वप्नातील राजकुमार व्हायचंय मला
तुझ्या मनातील एक पान व्हायचंय मला
तुझ्या बरोबर राहून आयुष्याला नवीन वळण द्यायचंय मला
तुझ्या सुखातील जोडीदार
तुझ्या दु:खातील भागीदार व्हायचंय मला
तुझ्याच हृदयात राहायचंय मला

तुझ्यात गुंतून जायचंय मला
तुझ्याच नशेत डुबून जायचंय मला
तुझे सौंदर्य डोळ्यात टिपून ठेवायचंय मला
तुझ्यात हरवून जायचंय मला

आणि नंतर तुझ्यातच शोधायचंय मला
कसं सांगू मी तुला
तुझ्याच हृदयात रहायचंय मला

मैत्री

मैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....

एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालु लागतो...

नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...

मैत्री अशी होते..!

काय जादु असते मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...

कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....! ]

Tuesday, February 9, 2010

कॉफीची चव

Hello


त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो.
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"



Click Me! Click Me! Click Me!

ती डोळ्यांतुन खुदकन हसते

ती डोळ्यांतुन खुदकन हसते
अन गिरक्या लगबग घेते |
ओठांच्या शिंपलीवरती
इंद्रधनु सुंदर अवतरते ||
त्या नाजूक गालांवरती
फुलपाखरे किती भिरभिरती |
सायीच्या हातांमधुनी
प्रेमामृत नित पाझरते ||
मखमाल तिच्या स्मरणाने
जीव हलका फुलका होतो |
ममतेचे रेशीम धागे
ती असेच गुंफुनी जाते ||