╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Friday, February 12, 2010

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!

रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,
अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्न मी करतो,
हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न मी करतो,
तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघलतो,

सुरु होतो आठावनिचा तो खेळ,
नाही रहात पुन्हा झोपायचा ताल-मेळ,

असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे,
त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,
आणि स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,
खाडकन फुटावे,

कुठे कमी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,
तुझ्यावर येणार्या संकटाना,
परतीचा रस्ता मी दाखवत होतो,

तू केलेल्या प्रत्येक चुकावर,
माफ़ी मी मागत होतो,
तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,
वेळोवेळी मीच रडत होतो,

तुझ्याकडून झालेली चुक तुला कधीच दिसली नाही,
माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही किम्मत राहिली नाही,

कामाचा दबाव आहे असे म्हणून,
तू माला टाळत होतीस,
पण या कारणा खाली,
तूच माझ्या पासून दुरावत होतीस,

काम तेव्हा मीही करत होतो,
माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,
वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे,
तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,

तुझे काम हे कधी संपले नाही,
आपल्यातील वाढत गेलेले अंतर,
हे तर कधीच मिटले नाही,

दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,
तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,

आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,

प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,
पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...आठवण माझीही येइल मी गेल्यावर

-

प्रेम करायचे नाही, पुन्हा कधी फिरून!

प्रेम करायचे नाही, पुन्हा कधी फिरून!
का कळत नाही, पण नक्कीच काहीतरी होतंय!
वेड्या या मनामध्ये, बहुतेक कोणीतरी बसलंय!

आजकाल मला जरा लवकर जाग येते,
कॉलेजमध्ये जायची खूप घाई लागते!
नास्ता करायची सुद्धा मला शुद्ध नसते!
फक्त तिलाच पाहण्याची आस मनात असते!

कॉलेजमध्ये डोळे तिलाच शोधत असतात,
कॅन्टीन, कॅम्पस, क्लासरूम सगळीकडे फिरतात!
ती मात्र कुठेतरी अभ्यास करत असते,
मैत्रिणींच्या घोळक्यात कुठेच कधी नसते!

खूप खूप वाटत तिच्याशी कधीतरी बोलाव,
जवळ तिला घेऊन सार काही सांगाव!
मनातले भाव मात्र ओठावर कधीच येत नाही,
तिला जाऊन बोलण्याच धाडस कधी होत नाही!

समोर कधी आलीच तर डोळे आपोआप झुकतात,
माझे सेवक असूनही चाकरी तिची करतात!
शब्द सुद्धा तेव्हा माझ्याशी फितुरी करतात,
कुणास ठाऊक का, सगळे असे का वागतात!

कॉलेजमध्ये एकदा ती साडी घालून आली,
नव्या नवरीवाणी सजून-धजून आली!
पाहता क्षणीच तिला भान हरपुन गेले,
तिच्याच रुपामध्ये सारे विसरून गेले!

पण काल जेव्हा तिला मी त्याच्याबरोबर पहिले,
काळजातील स्वप्न खळकन तुटले!
आवाजसुद्धा होऊ दिला नाही मी तुटलेल्या काळजाचा,
मनातच दाबल्या भावना, वेड्या या मनाच्या!

खूप खूप ठरवले कि रडायचे मात्र नाही,
इथेसुद्धा डोळ्यांनी माझी साथ दिली नाही!
तुटून गेले हृदय, अन काळीज गेले चिरून,
प्रेम करायचे नाही, पुन्हा कधी फिरून!


-

पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!

नकळत तुझं मित्रत्व
मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं
माझ्या भावनांचं विश्व
तेव्हाच विस्तारलं होतं

तुला रोज बघणं
आयुष्यातली एक सवय बनत गेली
तुझ्या फोनची वाट पाहण्यात
संध्याकाळ माझी विरत गेली

तू समोर आल्यावर
शब्द सारेच पळून जायचे
तू गेल्यावर मग मात्र
काय काय सांगायचं होतं
याची आठवण करून द्यायचे

तुझ्या पहिल्याच हास्यात मी
पूर्णपणे डूबायचे आणि
आपल्या मैत्रीच्या वेलीला
आणखीनच जपायचे

मैत्री एवढी सुंदर असते
हे तुझ्या रूपाने जाणवलं
मनाला मोहवणाऱ्या प्रत्येक
गोष्टीत त्या वेळी तुझंच रूप दिसलं

धबधब्यासारखे दिवस वाहत
राहिले असताना तुझ्या सहवासात
मैत्री नकळत मागे पडली
आणि एक प्रेमांकुर उमलला मनात

स्वभाव तुझा मी रोज
पडताळून बघायचे
रोजच्या बोलण्यात मात्र
नवीनच अनुमान निघायचे

तू दिसला नाहीस कधी
तर मेघ डोळ्यात उतरायचे
आणि घरी परत जाताना
मला चिंब भिजवायचे

परत दुसऱ्या दिवशी तू
त्याच गोड चेहऱ्याने हजर
सगळं विसरून पुन्हा तुला
बघायला आतुर असायची नजर

पण सुखाची चाहूल दुःख घेतं
तसंच काहीसं झालं
मैत्री आणि प्रेम मिश्रित हे
नातं एका गैरसमजामुळे विरत गेलं

कदाचित चूक नव्हती
दोघांचीही ,पण जिद्द
होती ना आपापला इगो मिरवण्याची

मनातली ठसठस जेव्हा
खूपच तीव्र झाली
मैत्रीने एक पाउल पुढे
टाकलं ,आणि मी माघार घेतली

हो , मी माघार घेतली
आणि इगो सोडून दिला
कारण तू दिलेल्या दुःखापेक्षा
मला तू स्वतः जास्त मोलाचा वाटला

तू सुद्धा मनातलं किल्मिष
काढून टाकलस
आणि हसून मी तुझ्या
सोबत आहे , हे
दाखवून दिलंस ....

आता तू असतोस सोबत
म्हणून मी स्वतःवरच खुश असते
रोजचीच संध्याकाळ आता
अजूनच छान दिसते

वाटतं एकदा सांगून टाकावं
मनातलं गुपित सारं
दुसरयाच क्षणी जाणवतं
समजल्यावर सगळं तू
अजूनच दूर गेलास तर ?


मला माहित आहे रे ,
तुझ्या पसंतीत मी
कुठेच बसत नाही ,
पण काय करू , मन
असं धावतं कि थांबतच नाही

एकदा हो म्हणून तर बघ ,
तुझ्यासाठी पूर्णपणे स्वताला बदलेन
तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी
उचलून फक्त फुलंच त्यावर पसरेन

मला तुला आयुष्यात
खूप सुखी झालेलं बघायचंय
रात्री झोपशील ना जेव्हा,
तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं
समाधानाचं हसू , हळूच
डोळ्यांनी टिपायचय
....

माझ्या मनाच पाखरू...

माझ्या मनाच पाखरू,
उडे पन्ख पसरोनी,
त्याला कस आवरू आवरू,
खन्त वाटे मनोमनी

माझ्या मनाच पाखरू,
त्याला पन्खाचे आले बळ,
त्याला कस ग थोपवू,
मनोमनी उठे कळ

माझ्या मनाच पाखरू,
बोले मन्जुळ मन्जुळ,
त्याची गोड बोल्गाणी,
भीजवी कातळ कातळ

माझ्या मनाचे पाखरू,
कधी आकाशाला भीडे,
त्याची झेप भीवविते,
त्याले धरणीचे वावडे

माझ्या मनाचे पाखरू,
आज आले परतुनी,
त्याचे सारे पन्चप्राण,
जपले मनाच्या ओन्जळीनी

कुणी तरी असाव आपल

कुणी तरी असाव आपल
आपल्याला समजुन घेणारे
परक्या दुनियेत टोल जाताना आपल्याला सवार्नारे
तिरस्कराच्या गर्दित
आपल्यावर प्रेम करणारे
कुणीतरी असावा आपल
दुनियेशी लढताना
आपल्या बाजूने लाधानारे
कुणीतरी असाव आपल
आपली बाजू मांडनारे
संकुचित या भावनांमधे
मोठा मन असणारे
जीव घेनार्यांच्या या दुनियेत
आपल्या साठी जीव देणारे
कुणीतरी असाव आपल
चुकून डोळ्यात पानी आल तर
प्रेमाने पुसनारे
कुणीतरी असावे आपले ................ ( i think its incomplete)

तिच्या आठवणी

आज शांत एकांती
येति आज शांत एकांती
येति तिच्या आठवणी
आठवते सारे...सारे
गुणगुणले होते कुणी...
गुणगुणले होते कुणी----
मुग्ध कळी उमलली
उमलली तुझ्याचसाठी;
तुझ्याचसाठी वेडी कुणी!
तुझ्याचसाठी वेडी कुणी,
तुझ्या कळते नकळत;
कळते न तुला वेड्या,
गाते ती रे प्रेमगाणी!
प्रेमगाणी विरली अन्‌
अन्‌ आर्त सूर आता
उरलेले रेंगाळती---
आज शांत एकांती...
आठवते सारे...सारे
गुणगुणले होते कुणी...

गुणगुणले होते कुणी---
मुग्ध कळी उमलली
उमलली तुझ्याचसाठी;
तुझ्याचसाठी वेडी कुणी!
तुझ्याचसाठी वेडी कुणी,
तुझ्या कळते नकळत;
कळते न तुला वेड्या,
गाते ती रे प्रेमगाणी!
प्रेमगाणी विरली अन्‌
अन्‌ आर्त सूर आता
उरलेले रेंगाळती---
आज शांत एकांती...

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही..

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,
"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.


विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच ऊरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...

Wednesday, February 10, 2010

प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.

यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात......

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

अजुनही आठवतयं मला

अजुनही आठवतयं मला
तो लिंबोणीच्या फांदीचा झुला
त्यावर बसून हसत म्हणायचीस..
"मुर्खा, बघतोस काय झुलव ना मला.."

अजुनही आठवतयं मला
तो तुला आवडणारा पाऊस
मला विसरून म्हणायचीस,
"पावसा, बघतोस काय चिंब भिजव ना मला.."

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते फुलपाखरू
त्याकडे हात लांबवत म्हणायचीस..
"पाखरा, बघतोस काय तुझ्या पाठीवर घे ना मला"

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते बेडकाच पोहणं
त्याला हुश्श करून म्हणायचीस..
"बेडका, पाण्याचा ठाव कुठे आहे सांग ना मला"..

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते सोनचाफ्याच झाडं,
त्याला पाहुन लाजून म्हणायचीस..
"चाफ्या, माझ्या लग्नात तुझ्या फुलांची माळ घालीन त्याला.."

अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारा तो बर्फाचा गोळा..
तो खाताना ओठांवरून जिभ फिरवत म्हणायचीस..
"गोळावाल्या, अजुन थोडासा गोड कर ना याला"

अन आजसुद्धा तु तशीच आहे,
हे पानीपुरी खाताना पाहीलं
अन तेव्हा माझं मन खरचं,
तुझ्या त्या छकुल्या कुशीला कवटाळत राहीलं.


मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही