╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Wednesday, December 16, 2009

सोबत

उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसणे थाबणार नाही || १ ||
डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध || २ ||
तू असे म्हणतोस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||
तू नाही आता एकटा
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||
म्हणुन खरे सांगते तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझी
तू राहशील का माझा ? || ५ ||
तू नव्हतास तेव्हा
“जीवन” माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
“जीवनाला” आहे अर्थ || ६ |

तू…

तू अल्लड नदी
की
अवखळ वारा ?
तू राजकुमारी
की
माझी स्वप्न सुंदरी ?
माझ्या हृदयाची देवी
की
स्वच्छंदी सिहांची छावी ?
तू अजाण बालिका
की
चंचल मनाची संचालिका ?
तू शांत सागर
की
तू धगधगते नगर ?
तू प्रेमाची मूर्ति
की
सौंदर्याची अभिजात कलाकृति ?
तू माझी माऊली
की
माझ्या प्रेमाची सावली ?
तू जगण्याची आशा
की
तू कातरवेळची निशा ?
तू यशाचा थंड झरा
की
तू धगधगता निखारा ?
तू मंदिरातील समई मंद
की
तू जीवनातील मुक्त छंद ?
तू पहिल्या पावसाचे थेंब
की
माझे प्रतिबिंब ?

म्हणून तर बघा – I LOVE YOU …

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात….

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ……..
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
” I LOVE YOU ”

कोडे ….

सर्वात सुंदर काय … ?
मैत्रीतले मन ..
का ..
मनातली मैत्री ?
मनात असते तुझीच मैत्री
का ….
तुझ्याच मैत्रीत मन ?
कोडे……..
मनातील तुझे विचार
का …..
तुझ्या विचारांनी भरलेले मन ?
कोडे …..
विचारां मधे फ़क्त तू
का ….
तू म्हणजे फ़क्त विचार ?
कोडे …..
तू म्हणजे मन
का …..
तू म्हणजे मैत्री ?
कोडे…..
तू म्हणजे प्रेम
का
प्रेम म्हणजे तुझी मैत्री ?
कोडे…..

सखे, तुझ्या ओल्या केसात…

सखे, तुझ्या ओल्या केसात
सुरांचा उन्माद असु दे

तुझ्या केसातुन बरसावं… माझ्या शब्दांचं वादळ
त्याला कवितांचा नाद असु दे

तुझ्या रातराणी मेहेफ़िलिनं… छेडावी जीवघेणी गझंल,
माझ्या उध्वस्त जीवाची
…………………….त्याला उन्मुक्त दाद असु दे

तो मोहाचा घोट प्यायला…. मी कधी पासुन आतुर,
तुझ्या अनावर पाशाची
……………………त्याला मनसोक्त साद असु दे

सखे, तुझ्या ओल्या श्वासात
माझा….
…………………….गुलमोहरी श्वास असु दे

तुझ्या देहावर फ़ुलावा….. माझ्या स्पर्शाचा सडा,
तुझ्या मस्तवाल कळ्यांना
……………………..माझ्या मिठीचा वास असु दे

तुझी कातरवेळ असावी….. माझ्या रात्रीला बिलगायला व्याकुळ,
तुझ्या संधी प्रकाशाला सुद्धा
……………………माझ्या विरहाचा भास असु दे

तुझ्या पारीजातकानं झुरावं…….. माझ्या उन्मत्त बहाव्यासाठी,
तुझ्या वसंतातल्या श्रुंगाराला
…………………..माझ्या पानझडीचा ध्यास असु दे

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे…

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे……..

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे……..

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे………

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे…….

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे………..

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

अस्तित्त्व --

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली
...आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !
कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी
!नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी ..
.मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली...
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !
कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी ...
आपल्या भावना समजून घेणारी !
शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व --

सावन बरसे... बिना भिगायें

सिनेमात पाऊस येतो, तेव्हा हीरोइनला पारदर्शक कपड्यात भिजवणं दिग्दर्शकाला खूप आवडतं. राज कपूर, यश चोप्रा यांची तर ही खास आवड. पण अनेक सिनेमांमध्ये अशी अनेक गाणी आहेत जी पावसाची आहेत, पण त्यात हीरोइनला अजिबात भिजवलेलं नाही. तरीही ही गाणी पाऊस पडला की हमखास आठवतात.

.........

सिनेमात पावसाचं गाणं नाही, मग तो हिंदी सिनेमाच नाही. हीरो-हीरोइन यांच्यातल्या प्रेमातला एकमेव साक्षीदार असतो तो पाऊस. पावसात भिजत प्रियकराची मनधरणी करणारी हीरोइन आपण खूपदा पाहिली आहे. प्रेमी जिवाला प्रेमाचं भरतं आलं की हमखास पाऊस पडायला हवा असतो. पण अनेक सिनेमांमध्ये अशी गाणी असतात. ज्या गाण्यात पाऊस असतो पण पडद्यावर मात्र अजिबात पडत नसतो. तरीही पावसाची गाणी म्हटलं की, अशी गाणी आठवायला लागतात.

' जब वी मेट' या सिनेमात 'तुमसे ही दिन होता है...' या गाण्यात पाऊस पडतो. त्या गाण्यात पिवळ्या छत्रीत करिश्मा काळ्या ड्रेसमध्ये बिनधास्त नाचते आणि शाहिद कपूर ड्रायव्हरने ऑफर केलेली छत्री बाजूला सारून नाचतो. याच सिनेमात शास्त्रीय गायक राशीद खान यांच्या आवाजातलं 'आओगे जब तुम वो साजना' हे गाणं आहे. गाण्यातली सिच्युएशन पावसाची अजिबात नाही पण, 'बरसेगा सावन अंगना फूल खिलेंगे' असं म्हणत पावसाच्या येण्याची प्रफुल्लता प्रियकराच्या येण्याइतकीच आनंददायी असते, हे सांगून टाकते.

' युवा' सिनेमात अदनान सामी आणि अलका याज्ञिकने गायलेलं एक सुरेख गाणं आहे. त्या गाण्याची सिच्युएनही पावसाची नाही आणि पावसाचं गाणं नाही. पण तरीही त्यात पाऊस आहे.

बादल वो आये, आये

गमीर् बढ़ाये, हाये

पानी भी लाये

उसकी मर्जी

असं म्हणत पावसाचा लहरीपणा माणसाचाही स्थायी भाव दाखवून देतो. 'इन दिनो' हे 'लाइफ इन मेट्रो' सिनेमात पाऊस खूप छान कॅरेक्टर म्हणून येतो. 'दस' सिनेमात हरिहरनच्या आवाजातलं एक अप्रतिम गाणं आहे. सिनेमातल्या अॅक्शन आणि 'दस बहाने करके ले गया दिल' या गाण्यामुळे त्या गाण्याकडे जरा दुर्लक्षच झालं. 'बंद आखो से तूम आज तूम को देखले' या गाण्यात पाऊस आणि भावना या किती सारख्या असतात, हे सांगतात कवीचा अंदाज खूप शायराना झाला आहे.

ये किस लिए इन आखों मे

सिसक रही है बारीशे

आणि मग

बूंद बूंद छलके टपके

बरसे मेरा मन

भीग भीग जाये

भीगेे होठ से सावन

अशा शब्दांमध्ये पाऊस पडतो. अर्थात, मठ्ठ चेहऱ्याचा सुनील शेट्टी आणि इशा देओल यांनी कितीही ठरवलं असतं तरी या शब्दातल्या भावना खचितच पडद्यावर दाखवता आल्या असत्या. कदाचित हे गाणं लोकांच्या स्मरणात न राहण्याचं तेही एक कारण असावं.

' बॅण्डिट क्वीन' नावाचा सिनेमा. फुलनदेवीच्या आयुष्यावरचा. सिनेमातली अनेक दृश्यं आपल्या अंगावर येणारी. याच सिनेमात एक पावसावरचं अप्रतिम गाणं आहे. अर्थात, त्यात पाऊस मात्र नाही. फुलनच्या आयुष्यातल्या एकमात्र सुखाचा क्षण चित्रित करताना बॅकग्राउण्डला हे गाणं वाजतं. उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं तब्बल आठ मिनिटांचं आहे.

कामधंद्यासाठी परदेशी गेलेल्या पतीला उद्देशून लोकगीताच्या ओळी आधी कोरसमध्ये येतात.

सावन आया रिमझिम सावरे

आये बादल कारे कारे

मतवारे प्यारे प्यारे

मोरे अंगना झूमके

घिर घिर आयी उड़ी उड़ी

देखो मस्त घटाये

फुर फुर आज उड़ाये आँचल

मोरा सर्द हवाये...

अशा शब्दांमधून पावसापूवीर्चं मस्त ढगाळ वातावरण अनुभवता येतं. आणि नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात 'मोरे सैया तो है परदेस मै क्या करू सावन को, सुना लागे सजन बिन देस... असं म्हटल्यावर पावसात आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह किती जीवघेणा असतो, याची जाणीव होते.

' सत्या' हा अण्डरर्वल्ड या विषयावरचा सिनेमा. या सिनेमात 'गिला गिला पानी' असं पावसावरचं चिंब चिंब भिजवणारं गाणं आहे. ऊमिर्ला मातोंडकरला कॉटन साडीत भिजवण्याचा मोह रामूला या गाण्यात आवरला नव्हता. याचं सिनेमात भूपेंदने खूप वर्षांनी एक गाणं गायलं. 'बादलो से काट काट के...'. या गाण्यात गुलाार लिहून जातो,

एक बार तुमको जब

बरसते पानियो के पार देखा था

यू लगा था जैसे

गुनगुनाता एक आबसार देखा था

तबसे मेरी नींद में बरसती रहती है...

संजय लीला भन्साळीच्या '१९४२ अ लव स्टोरी' सिनेमात पावसाचं अप्रतिम गाणं आहे. 'रिमझिम रिमझिम....' पिवळ्या साडीत गोड दिसणारी मनीषा कोईराला आणि अनिल कपूर यांना अजिबात न भिजवता हे गाणं चित्रित केलं आहे. तर अगदी अलीकडच्या 'थोडा मॅजिक थोडा प्यार'मध्ये 'सिधी सपाट जिंदगी...' या गाण्यात

कभी सोचा है क्या, बारीश क्यू भाये

क्यू गीत बेवजह, होंठो पे आये

हा पाऊस आपल्याला गाणं लिहायला भाग पाडतो, असं प्रसून जोशी सांगून टाकतो.

हवाहव्याशा वाटणाऱ्या पावसाची अनेक गाणी आहेत. पण कोणालाही न भिजवता आपल्या चिंब करणारी गाणीही खूप आहेत. फक्त जरा कान देऊन ती ऐकायला हवी इतकंच.

हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!

प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!
तु कौलेजला आलीस कीमाझी नजर तुझ्यावर
खिळतेत्यातुनच पुढचं आयुष्य जगायचीस्फुर्ती मला मिळते!
तु इतकी सुंदर आहेस कीकुणाचही तुझ्यावर
प्रेम बसेलखुप भाग्यवान ठरेल तोज्याच्यावर
तुझं प्रेम बसेल!प्रेमे मिळणं ही सुध्दाएक कला
आहे,पण मी प्रेम मिळवु शकलो नाहीयाचं दु:ख मला आहे!
शाळेत मुलीच्या बाजुला बसणंही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावंही माझी छोटीसी अपेक्षा होती!
चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोरनेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!