╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Wednesday, December 16, 2009

सावन बरसे... बिना भिगायें

सिनेमात पाऊस येतो, तेव्हा हीरोइनला पारदर्शक कपड्यात भिजवणं दिग्दर्शकाला खूप आवडतं. राज कपूर, यश चोप्रा यांची तर ही खास आवड. पण अनेक सिनेमांमध्ये अशी अनेक गाणी आहेत जी पावसाची आहेत, पण त्यात हीरोइनला अजिबात भिजवलेलं नाही. तरीही ही गाणी पाऊस पडला की हमखास आठवतात.

.........

सिनेमात पावसाचं गाणं नाही, मग तो हिंदी सिनेमाच नाही. हीरो-हीरोइन यांच्यातल्या प्रेमातला एकमेव साक्षीदार असतो तो पाऊस. पावसात भिजत प्रियकराची मनधरणी करणारी हीरोइन आपण खूपदा पाहिली आहे. प्रेमी जिवाला प्रेमाचं भरतं आलं की हमखास पाऊस पडायला हवा असतो. पण अनेक सिनेमांमध्ये अशी गाणी असतात. ज्या गाण्यात पाऊस असतो पण पडद्यावर मात्र अजिबात पडत नसतो. तरीही पावसाची गाणी म्हटलं की, अशी गाणी आठवायला लागतात.

' जब वी मेट' या सिनेमात 'तुमसे ही दिन होता है...' या गाण्यात पाऊस पडतो. त्या गाण्यात पिवळ्या छत्रीत करिश्मा काळ्या ड्रेसमध्ये बिनधास्त नाचते आणि शाहिद कपूर ड्रायव्हरने ऑफर केलेली छत्री बाजूला सारून नाचतो. याच सिनेमात शास्त्रीय गायक राशीद खान यांच्या आवाजातलं 'आओगे जब तुम वो साजना' हे गाणं आहे. गाण्यातली सिच्युएशन पावसाची अजिबात नाही पण, 'बरसेगा सावन अंगना फूल खिलेंगे' असं म्हणत पावसाच्या येण्याची प्रफुल्लता प्रियकराच्या येण्याइतकीच आनंददायी असते, हे सांगून टाकते.

' युवा' सिनेमात अदनान सामी आणि अलका याज्ञिकने गायलेलं एक सुरेख गाणं आहे. त्या गाण्याची सिच्युएनही पावसाची नाही आणि पावसाचं गाणं नाही. पण तरीही त्यात पाऊस आहे.

बादल वो आये, आये

गमीर् बढ़ाये, हाये

पानी भी लाये

उसकी मर्जी

असं म्हणत पावसाचा लहरीपणा माणसाचाही स्थायी भाव दाखवून देतो. 'इन दिनो' हे 'लाइफ इन मेट्रो' सिनेमात पाऊस खूप छान कॅरेक्टर म्हणून येतो. 'दस' सिनेमात हरिहरनच्या आवाजातलं एक अप्रतिम गाणं आहे. सिनेमातल्या अॅक्शन आणि 'दस बहाने करके ले गया दिल' या गाण्यामुळे त्या गाण्याकडे जरा दुर्लक्षच झालं. 'बंद आखो से तूम आज तूम को देखले' या गाण्यात पाऊस आणि भावना या किती सारख्या असतात, हे सांगतात कवीचा अंदाज खूप शायराना झाला आहे.

ये किस लिए इन आखों मे

सिसक रही है बारीशे

आणि मग

बूंद बूंद छलके टपके

बरसे मेरा मन

भीग भीग जाये

भीगेे होठ से सावन

अशा शब्दांमध्ये पाऊस पडतो. अर्थात, मठ्ठ चेहऱ्याचा सुनील शेट्टी आणि इशा देओल यांनी कितीही ठरवलं असतं तरी या शब्दातल्या भावना खचितच पडद्यावर दाखवता आल्या असत्या. कदाचित हे गाणं लोकांच्या स्मरणात न राहण्याचं तेही एक कारण असावं.

' बॅण्डिट क्वीन' नावाचा सिनेमा. फुलनदेवीच्या आयुष्यावरचा. सिनेमातली अनेक दृश्यं आपल्या अंगावर येणारी. याच सिनेमात एक पावसावरचं अप्रतिम गाणं आहे. अर्थात, त्यात पाऊस मात्र नाही. फुलनच्या आयुष्यातल्या एकमात्र सुखाचा क्षण चित्रित करताना बॅकग्राउण्डला हे गाणं वाजतं. उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं तब्बल आठ मिनिटांचं आहे.

कामधंद्यासाठी परदेशी गेलेल्या पतीला उद्देशून लोकगीताच्या ओळी आधी कोरसमध्ये येतात.

सावन आया रिमझिम सावरे

आये बादल कारे कारे

मतवारे प्यारे प्यारे

मोरे अंगना झूमके

घिर घिर आयी उड़ी उड़ी

देखो मस्त घटाये

फुर फुर आज उड़ाये आँचल

मोरा सर्द हवाये...

अशा शब्दांमधून पावसापूवीर्चं मस्त ढगाळ वातावरण अनुभवता येतं. आणि नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात 'मोरे सैया तो है परदेस मै क्या करू सावन को, सुना लागे सजन बिन देस... असं म्हटल्यावर पावसात आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह किती जीवघेणा असतो, याची जाणीव होते.

' सत्या' हा अण्डरर्वल्ड या विषयावरचा सिनेमा. या सिनेमात 'गिला गिला पानी' असं पावसावरचं चिंब चिंब भिजवणारं गाणं आहे. ऊमिर्ला मातोंडकरला कॉटन साडीत भिजवण्याचा मोह रामूला या गाण्यात आवरला नव्हता. याचं सिनेमात भूपेंदने खूप वर्षांनी एक गाणं गायलं. 'बादलो से काट काट के...'. या गाण्यात गुलाार लिहून जातो,

एक बार तुमको जब

बरसते पानियो के पार देखा था

यू लगा था जैसे

गुनगुनाता एक आबसार देखा था

तबसे मेरी नींद में बरसती रहती है...

संजय लीला भन्साळीच्या '१९४२ अ लव स्टोरी' सिनेमात पावसाचं अप्रतिम गाणं आहे. 'रिमझिम रिमझिम....' पिवळ्या साडीत गोड दिसणारी मनीषा कोईराला आणि अनिल कपूर यांना अजिबात न भिजवता हे गाणं चित्रित केलं आहे. तर अगदी अलीकडच्या 'थोडा मॅजिक थोडा प्यार'मध्ये 'सिधी सपाट जिंदगी...' या गाण्यात

कभी सोचा है क्या, बारीश क्यू भाये

क्यू गीत बेवजह, होंठो पे आये

हा पाऊस आपल्याला गाणं लिहायला भाग पाडतो, असं प्रसून जोशी सांगून टाकतो.

हवाहव्याशा वाटणाऱ्या पावसाची अनेक गाणी आहेत. पण कोणालाही न भिजवता आपल्या चिंब करणारी गाणीही खूप आहेत. फक्त जरा कान देऊन ती ऐकायला हवी इतकंच.

0 comments:

Post a Comment