╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Wednesday, December 16, 2009

निवडक चारोळ्या तुमच्या साठि..

मित्र हो!
माझ्या प्रेमाची मला,
परतफ़ेड मिळाली आहे,
मी गुन्हेगार नसतानाही,
त्याची पुरेपुर शिक्षा मी भोगली आहे.

त्याच्या साठि आज चारोळ्या लिहिल्या,
माझ्या मनाची अवस्था समजेल म्हणुन,
त्या प्रसिद्धिला आणल्या,
त्याने मात्र त्या आजवर नाहि वाचल्या.

आमच्या प्रेमाच्या साक्षिला सुरुच्या बागा होत्या,
समुद्राच्या ठिकाणी जाणाऱ्या नागमोडी वाटा होत्या,
मंदिरातली अबोल देवाची मुर्ति होती,
न पाहीलेलि अशी दुरवर विसावलेली आमची मने होती.

आज तो आहे नामवंत हुद्यावर,
ओळख देवू शकत नाही मी त्याची यावर,
तो आहे आज खुप सुखांवर,
पण तो मागे आहे आज प्रेमाच्या मुद्यावर.

खरचं प्रेमात मी खुप काही हरवल आहे,
माझं शिक्षण-माझी नोकरी,
सुखाचे दिवस सोनेरी,
उरली फ़क्त चारोळीच्या रुपातुन मिळणारी शांती.

आज तो माझ्या प्रत्येक श्वासात आहे,
त्याच्या आठवणी माझ्या ह्र्दयाचा भाग आहे,
माझ्या कवितांत तोच आहे,
दुसरे कुठे काय आहे?

तुम्हाला सांगु,
माझ्या चारोळ्या प्रेमाची अखंड गाथा आहे,
खऱ्या प्रेमात किती भोग आहे,
या साऱ्याचीच ती खरी व्यथा आहे.

माझ्या चारोळ्यात मी माझ आयुष्य उतरवलं,
शब्दांच्या गुंफ़नातुन त्याला सजवलं,
त्याच्या विरहानेच मला आज,
कवयित्रि बनवलं.

त्याला अभिमान होता स्वत:च्या रुपावर,
स्वत:च्या तल्लख बुद्धीवर,
मला अभिमान होता माझ्या लेखणीवर,
जे त्याचे आयुष्य एकदा तरी,
कागदावर उतरवेल यावर.

0 comments:

Post a Comment