मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो
मला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो…
वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो…
ओळख असलेलेच भेटती लोक मला, पण
बघून ‘त्यांना’ हसण्यासाठी वेळच नसतो…
प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही?
प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?…
नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हा
नशिबी माझ्या ‘घडण्यासाठी’ वेळच नसतो…
‘अजब’ चालली कशाला पुढे इतकी दुनिया?
कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो..
╰» αвσυт мє

- ۩۞۩ मराठी कविता ۩۞۩
- Mumbai, Maharashtra, India
- एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....
Wednesday, December 16, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment