......बघ माझी आठवण आलीच ना....??
आज त्याचा वाढदिवस,
तो तुला होटेलात नेईल.......बघ माझी आठवण येते का....??
खिशातून एक चॉकलेट काढून देईल
त्याचा कागद उघड,
अलगद दोन तुकडे कर,
एक त्याला दे, एक तू खा
तो म्हणेल....नको
तूच संपव, तुझ्यासाठीच आहे......बघ माझी आठवण येते का....??
तुझ्यावाटणीचा चॉकलेट खाशील
अर्धा उरलेला पर्स मध्ये ठेव
काय हे.....तो म्हणेल,
किती कचरा जमवतेस
असुदेत.....आधीच्या चॉकलेटचे कागद
तो हसेल, म्हणेल वेडी कुठली......बघ माझी आठवण येते का....??
तो विचारेल काय खाणार
तू म्हण वोटरमिलन ज्यूस,
तो रागावेल,
वेज क्रिस्पी आणि ज्यूस ऑर्डर करेल
आलं की थोडंसं खा,
जबरदस्ती त्याला संपवायला लाव.......बघ माझी आठवण येते का....??
तो मल्टीप्लेक्स मध्ये नेईल
त्याला हिंदी फिल्म पहायची असेल,
तू इंग्लिशच्या तिकीट काढ
तरी तो येईल, बसेल गप्प
पॉपकोर्न आण, त्याला दे तू खा
चायला काही समजला नाही म्हणेल.......बघ माझी आठवण येते का....??
घरी ये, तो आणि तू
बेडरूम मध्ये जा,
पर्स मधला चॉकलेट काढ,
हळूच त्याला sms कर
तू दिलेला चॉकलेट मी खातेय,
तो हसेल....तू ही हस..........बघ माझी आठवण येते का....??
तो म्हणेल, वेडी रे वेडी
आज तोच दिवस,
तेच सर्व, छान होते ते दिवस
आत्ता धावपळ, काम.....
तरी तू आहेस माझ्याजवळ
तो तुला कुशीत घेईल, अगदी तशीच.......बघ माझी आठवण येते का....??
तू त्याला मिठी मार,
एकदा त्याच्या डोळ्यांत बघ,
थोड़ीशी हस,
आजही त्याला तू तितकीच आवडतेस
तो गालावरून बट कानामागे टाकेल
डोळे मिट.....अलगद स्वप्नात रमून जा.......बघ माझी आठवण आलीच ना....??
╰» αвσυт мє

- ۩۞۩ मराठी कविता ۩۞۩
- Mumbai, Maharashtra, India
- एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....
Thursday, February 5, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment