मित्रापेक्षा जास्त आणि प्रियकरापेक्षा कमी,
नाही रे, तोलत नाहिये मी ही अनमोल नाती...
पण आहेस तरी नक्की कोण तू माझा,
अवचित या मोहक वळणावर भेटलेला...
गुंफलेस तू धागे विश्वासाचे,
देतोहेस साथ,पाळतोय निती नियम ही जगाचे...
केवढी आहे आपली मित्र-मैत्रिणींची फौज,
तरी कुणातही नाही अजुन ही कुजबुज...
पण ठाऊक आहे हे दोघांना,
आवडतो आपण एकमेकांना...
घेतो दु:ख वाटून,अडचणी समजुन,
नाही दुखवत भावनांना...
पाठराखण करतो एकमेकांची,
रोजच उत्सुकता संवादाची...
ना ओढ आहे ही,ना आकर्षण,
ना दिलेय मन एकमेकांना आंदण...
पण,बोलायला लागले आहेत डोळे,
मैत्रीच्या वाटेवर फुलताहेत प्रेमाची फुले...
काय आहे तुझ्या मनात,
जरा बोल तरी शब्दांत...
खुप झालाय मजेशीर हा गुंता,
व्ह्ययलाच हवा आता उलगडा...
होईल का या नात्याची उकल,
एक मात्र जरुर कर...
मित्र 'रहाच' ,बनलास जरी प्रियकर,
कारण ,आपल्या मैत्रीचे नातेच तर आहे 'खरे' अमर...
╰» αвσυт мє

- ۩۞۩ मराठी कविता ۩۞۩
- Mumbai, Maharashtra, India
- एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....
Monday, February 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment