╰» αвσυт мє

- ۩۞۩ मराठी कविता ۩۞۩
- Mumbai, Maharashtra, India
- एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....
Thursday, February 19, 2009
अशा सांजवेळी काव्य..............
आभाळ जेव्हा भरून येतं
तेव्हा माझ्याही मनात आठवणिंची काळोखी दाटते
सैरभैर होऊन मग घरटं चुकलेल्या पाखरासारखं
एकेक झाड ते शोधायला लागतं
कितीही समजावलं तरी त्याला उमगत नाही
की घरटं आता राहिलचं नाही
कालपर्यंत माझं जग होतं
त्यातलं काहीसुद्धा उरलं नाही
जाताना तू काहीसुद्धा नेलं नाहीस
म्हणालीस आता तेवढा वेळ नाही
तुझ्याशिवाय जगताना
माझ्याकडे तेवढं सोडून काही नाही
म्हणून म्हणतो परत ये
कधिही न जाण्यासाठी
किती पुरणार आठवणी
तुझ्याशिवाय जगण्यासाठी........
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment