╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Wednesday, February 11, 2009

असते मतलबी, दुनिया ही सारी..............

असते मतलबी, दुनिया ही सारी,
पण आपले, निराळे, असतातही काही,
दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

जिथे असते श्रद्धा आणि भक्ति,
असे पुजनिय, असतात काही व्यक्ति,
क्षणिक असते, अबोल्याची सक्ति,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती,
कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती,
मनास होत नाही, कधी येथे क्षिती,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी

इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी,
विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी,
आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी,
मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी............

0 comments:

Post a Comment