तुझा प्रत्येक वार
मी मोठ्या आनंदाने सहला आहे
आणि आता तुझा आवडता शब्द
"नाही" हाच माझ्या जीवनाचा भाग बनला आहे
कारण...
तुला दुसर्या कोणाच्या जवळ जातांना पाहून
माझे मन कधीच दुखणार नाही...
तू कितीही सुंदर दिसत असलीस
तरीही मी तुझ्याकडे पाहणार नाही...
तुझ्या त्या गोड हास्याला व इशार्यांना पाहून
मी चुकुनही भूलणार नाही...
माझ्याकडे कितीही वेळ असला
तरीही मी तुझी कधीच वाट पाहणार नाही...
मित्रांमधे गप्पागोष्टी करतांना
तुझा विषय मी कधीच काढणार नाही...
एकटेपणात आणि एकांतात बसून
मला तुझी कधीच आठवण येणार नाही...
तुझ्यासमोर येतांना व चालतांना
माझे पाय आता कापणार नाही...
तुझ्या डोळ्यांशी बोलायला
माझे डोळे आता तयार होणार नाही...
तुझ्याबद्दलचे माझ्या मनातील कोड
सोडवण्यासाठी मी आता प्रयत्न करणार नाही...
माझ्या जीवनातील थोडासा वेळ घेतल्यबद्दल
मी तुझ्यावर कधी रागवणार नाही...
तुझ्याशी परत बोलायला येऊन
मी माझ्या भावनांचा खेळ होऊ देणार नाही...
तुझे असे असाधारण वागणे
माझे लक्ष वेधून घेऊ शकनार नाही...
माझे सर्व रस्ते आणि वाटा
तुझ्या रस्त्यन्शि कधीच मिळणार नाही...
किती काहीही झाले तरी
माझ्या मनात तुझा विचार परत येणार नाहि ...
╰» αвσυт мє

- ۩۞۩ मराठी कविता ۩۞۩
- Mumbai, Maharashtra, India
- एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment