स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना ...
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले ...
अंतर नेहमी वाढत जाते ...
मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही ...
त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही ...
हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ...
आज आशा वाटेवर मी उभा आहे ...
समोर काहीच दिसत नाही ...
पण मागे फिरावे की नाही ...
हे ही समजत नाही ...
पण या वाटेवर चालत राहण्याचा ...
मी प्रयत्न करेन ...
तुझ्या सोबत न रहता , तुझ्या
मानत राहण्याचा प्रयत्न करेन ...
मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे ...
यात आकर्षणाचा भाग नाही ...
पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ...
माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही ...
चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग ...
पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव ...
पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे ...
दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे ..
╰» αвσυт мє

- ۩۞۩ मराठी कविता ۩۞۩
- Mumbai, Maharashtra, India
- एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....
Thursday, February 5, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment